धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातील हॉटेल चक्क वेटरने मध्यरात्री फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील गणेश नगरातील रहिवासी असलेले किशोर चौधरी यांच्या मालकीची शहरात हॉटेल चंदन नावाने परमीट रूम व बिअर बार आहे. दि २८ जानेवारी रोजी य हॉटेलमध्ये कार्यरत असलेला वेटर व संशयित आरोपी विजयसिंग शेरसिंग ठाकूर हा दुपारी ४ वाजेपासून तर ३० रोजीच्या सकाळच्या वेळेत हॉटेलच्या खिडकीचे ग्रील तोडत हॉटेलच्या काऊटरमधील ३० हजाराची रोकड लंपास केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.राजेद्र कोळी हे करीत आहेत.