जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातील रस्त्यावर ६ अनोळखी चोरट्यांनी एका ३६ वर्षीय तरुणाच्या मित्राला मारहाण करीत तब्बल २२ हजार रुपयाचा मुद्देमाल घेवून पसार झाल्याने एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एमआयडीसी परिसरातील रामदेव बाबा मंदिर सुप्रीम कॉलनीनजीक दि ३१ जानेवारी रोजी कुसुंबा येथील देवेद्र काळे व त्यांचा मित्र शाहीद हे दोघे उभे असतांना एका प्रवासी रिक्षात ४ इसम व इतर दोन असे एकूण सहा जणांनी त्यांचा मित्र शाहीद याला मारहाण करीत त्यांच्याजवळील २० हजार रुपये किमतीचा मोबाईल, १ हजार ८०० रुपये रोकड, तसेच दुचाकीची चावी व त्यांचे महत्वाचे कागदपत्र घेवून फरार झाले, त्यानंतर देवेद्र शामराव काळे यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेत ६ अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनी अनिस शेख हे करीत आहेत.