पुणे : वृत्तसंस्था
शुल्लक कारणाने ३२ वर्षीय विवाहितेची पतीने गळा आवळून खून केला आहे. पुण्याच्या अप्पर इंदिरानगर परिसरातील रहिवासी असलेले परशुराम जोगण (वय 38) हे भाड्याची रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. रविवारी रात्री जेवण न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक केली आहे.
सविता संदीप औचिते (वय 32) असे गळा आवळून खून केलेल्या पत्नीचे नाव आहे. तर आरोपी पती परशुराम जोगण (वय 38) याला अटक केली आहे. गणेश दत्तात्रय शिंदे (वय 38) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. मयत महिला ही त्याची दुसरी पत्नी आहे. रविवारी रात्री त्यांच्यात भांडण झाले. मृत पत्नी दारू प्यायली होती. भांडण झाल्यामुळे पत्नीने जेवण वाढले नाही. यामुळे पती संतापला. याचाच राग मनात धरून आरोपीने लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तिचा खून केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.