जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात सात वर्षे मुलगा आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे या परिसरातीलच एकाने सात वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी बहुर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील एका गावातील सात वर्षीय मुलगा आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. या सात वर्षीय मुलास एकाने दिनांक २५ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास बिस्कीटचा पुडा घेण्यासाठी सोबत नेऊन संशयित आरोपीने त्याच्या घरात नेत आतील दरवाजा बंद करीत त्या सात वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी मुलाच्या आईने पहूर पोलिस स्थानकात संशयित आरोपी सुरेश भोई याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहे पोलिसांनी तात्काळ या आरोपीस अटक केली आहे.