Author: user

जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत दहिवद येथे १२ मे रोजी अज्ञात दरोडेखोरांनी कापूस व्यापाऱ्याला शस्त्रांचा धाक दाखवून १६ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेत कुठलेही सीसीटीव्ही फुटेज, दरोडेखोरांचे वर्णन, पुरेसे धागेदोरे उपलब्ध नसताना केवळ “क्राईम स्टडी” करून पोलिसांनी तिघा संशयितांना थेट मध्यप्रदेशातून मुद्देमालासह अटक करण्यात यश मिळविले. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी २७ रोजी सायंकाळी ५ वाजता दिली. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत दहिवद गावात १२ मे रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या दरम्यान कापूस व्यापारी धर्मराज पाटील यांच्या घरात सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून…

Read More

जळगाव प्रतिनिधी । खाटीक बिरदारीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी यांच्या कारचे टायर फुटल्याने कारचा अपघात झाल्याची घटना सोमवार 27 मे रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळ घडली आहे. या अपघातात कारचालक आणि एक मुलगी जखमी झाली असून मुफ्ती हारून नवी व त्यांची पत्नी हे किरकोळ जखमी झाले आहे. खाटीक बिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी हे आपल्या परिवारासह मुंबई येथे गेले होते. दरम्यान ते मुंबईवरून जळगावकडे येत असताना सोमवारी 27 मे रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळ त्यांच्या कारचे टायर फुटले. त्यामुळे कारचा अपघात झाला. या अपघातात कारचालक व मुलगी हे जखमी झाले…

Read More

जळगाव प्रतिनिधी । गुजरात राज्याची पासिंग असलेल्या तीन ट्रकमधून गुरांची वाहतूक होत असताना २७ मोठे गुरे व सहा वासरांची सुटका करून ती कुसुंबा येथील गोशाळेत नेण्यात आली. रविवार २७ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी ही वाहने आकाशवाणी चौकात अडविली व त्याची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलिसांनी ती गोशाळेत सोडली. याबाबत अधिक माहिती अशी की, सुरत येथून (जीजे ०२, झेड झेड ६४८९), (जीजे ०२, झेड झेड ७४७९) व (जीजे ३१, टी २७६०) या तीन ट्रकमध्ये २७ मोठे गुरे व सहा वासरांची वाहतूक होत असल्याचे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना आढळून आले. त्यावेळी त्यांनी ही वाहने आकाशवाणी चौकात…

Read More

अमळनेर प्रतिनिधी ।  तालुक्यातील सावखेडा रस्त्यावरून अवैधपणे मालवाहू वाहनातून निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणारे वाहन शनिवारी 25 मे रोजी पहाटे 5.30 वाजता पोलिसांनी पकडले. याप्रकरणी दुपारी 12 वाजता अमळनेर पोलिसात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावाजवळून असलेल्या रस्त्यावरून मालवाहू वाहनातून विनापरवाना निर्दयपणे गुरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने शनिवारी 25 मे रोजी पहाटे 5.30 वाजता कारवाई करत वाहन क्रमांक (एमएच 21 बीएच 7012) हे पकडले. त्यामध्ये तीन गाईंची निर्दयपणे वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात उन्हाचा पारा 45 वर पोहोचला आहे. त्यामुळे उष्णघातामुळे अनेक जणांचा मृत्यू होत आहे. दरम्यान बेवारस असलेल्या मृतदेह नाका येथील स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत मृतदेह पुरण्याचे काम सुरू आहे. परंतु हे मृतदेह वरच्यावर पुरले जात असून या ठिकाणी कुत्र्यांचा धुमाकूळ होऊन मृतदेहाची विटंबना होत असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते सुरज नारखेडे यांच्यासह नागरिकांनी रविवारी 26 मे रोजी दुपारी 2 वाजता आंदोलन करत जिल्हा प्रशासनावर ताशेरे ओढले आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेचा पारा 45° वर पोहोचले आहे. त्यामुळे रस्त्यावर असलेले इतर काही बेवारस नागरिकांचा उष्णघातामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव येथील एमआयडीसी वखार महामंडळात ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही कॅमेरे काही वेळ बंद झाल्याने खळबळ उडाल्याची घटना रविवारी २६ मे रोजी ९ ते ९.०४ वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान या वृत्ताला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील दुजोरा दिला आहे. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी जिल्हाभरात मतदान झाले आहे. दरम्यान या मतदानाचे ईव्हीएम मशीन हे जळगाव शहरातील एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या शासकीय गोदामच्या स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवण्यात आले आहे. या ईव्हीएम मशीनसाठी कडक सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहे. यात सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि स्थानिक पोलीस यांची सुरक्षा लावण्यात आली आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही येता जाता येत नाही.…

Read More

जळगाव- प्रतिनिधी । जळगाव ते भादली दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने एका परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी २६ मे रोजी मध्यरात्री २ वाजेच्या  सुमारास घडली आहे. या प्रकारणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. इर्शाद मेहबूब वय 30 रा. बाबुली  जि. पानिपत राज्य हरियाणा असे मयत झालेल्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव ते भादली अप लाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक 424 च्या 14 आणि 15 दरम्यान एका धावत्या रेल्वेतून परप्रांतीय तरुण इर्शाद मेहबूब हा खाली पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी २६ मे रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती…

Read More

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथील एका ३५ वर्षीय तरूणाने भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन शुक्रवारी २४ मे रोजी दुपारी घडली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शंकर मदन रल (वय ३५, रा. विरावली, ह. मु. दहिगाव ता.यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शंकर रल हा तरूण शुक्रवारी दुचाकीव्दारे भुसावळ शहराबाहेरील तापी नदीच्या पुलावर गेला. पुलावर दुचाकी लावुन त्याने थेट नदी पात्रात उडी घेतली. हा प्रकार नागरीकांच्या निर्दशनास येताचं त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी व नातलगांनी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात राहणाऱ्या तरुणांनी घरात धारदार शस्त्रे घेऊन नाचत व्हिडीओ तयार केला. व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी तपास केला. त्यानुसार चौघांना अटक करण्यात आली आहे. चौघांकडून २ चॉपर, १ तलवार आणि १ चाकू हस्तगत करण्यात आला आहे. शिवाजीनगर हुडको भागात मंदिराजवळ व्हिडीओमधील इसम दिसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यात पोलिसांनी दिपक सखाराम बागुल (वय-३२), तुषार संतोष जाधव (वय-२२), मनिष राजेंद्र बि-हाडे (वय-२०), संतोष कडु तायडे (वय-३२, सर्व रा.शिवाजी नगर हुडको) यांना अटक केली आहे. व्हिडीओमधील तलवार, कोयता, चॉपर हे त्यांनी त्यांचे घरी ठेवलेले पंचासमक्ष काढून दिले. कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर…

Read More

जळगाव प्रतिनिधी । रामदेववाडी अपघात प्रकरणी तिसरा संशयित ध्रुव नीलेश सोनवणे (१९, रा. गायत्रीनगर, जळगाव) यालाही पोलिसांनी अटक केले आहे. तो पुणे येथे जाण्यासाठी निघाला असतानाच पोलिसांनी त्याला उचलले. त्याला न्यायालयात हजर केले असता २७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. जळगाव तालुक्यातील रामदेववाडीजवळ ७ मे रोजी भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने आईसह दोन मुलांचा व भाचा असा चार जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अखिलेश संजय पवार व अर्णव अभिषेक कौल या दोघांना २३ मे रोजी ताब्यात घेऊन जळगावात आणले. त्यांना न्यायालयाने २७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणात आणखी एका जणाचा समावेश असल्याचे या पूर्वीच समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी…

Read More