Author: user

नाशिक वृत्तसेवा । नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात एका घटनेत दोन सख्ख्या भावांना करूण अंत झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जापत आहे. निफाड तालुक्यातील ढेपले वस्तीवर ही घटना घडली असून प्रेम ढेपले आणि प्रतीक ढेपले असे दोघे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. निफाड तालुक्यातील नांदुर्डी रस्त्यावर असलेल्या ढेपले यांच्या वस्तीवर विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्याकरता गोपाळ जयराम ढेपले यांची प्रेम आणि प्रतीक ही दोन्ही मुले विहिरीजवळ गेलेली होती. मात्र अर्धा तास उलटून देखील मुले का परत येत नाही हे बघण्यासाठी घरातील मंडळी त्यांना शोधण्यासाठी गेली. जवळपास शोध घेतला असता जवळच्या शेततळ्याजवळ एका…

Read More

जळगाव प्रतिनिधी । समर्थ नगरात राहणाऱ्या महिलेचे घर काही दिवसांपासून बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून ६३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना समोर आले आहे. याबाबत रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक असे की, संगीता काशिनाथ कोळंबे वय-४३ रा. समर्थ नगर पिंप्राळा, जळगाव या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. २५ एप्रिल रोजीपासून त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 63 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना बुधवारी 29 मे रोजी सकाळी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या समोर आलेल्या फुले मार्केटमधील तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडून ३५ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. यात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील सेंटर फुले मार्केट येथील मैत्री कलेक्शन तसेच प्रणाली लेडीज टेलर आणि श्रीराम ड्रायफ्रूट्स हे तीन दुकानाचे शटर उचकावून आज प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी रोकड आणि काही मुद्देमाल असा एकूण ३५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २९ मे रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मैत्री कलेक्शनचे…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शिवकॉलनी परिसरातून वृध्द महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखांची सोनसाखळी अज्ञात दोन जणांनी जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरात विनोद प्रभाकर बाविस्कर यांच्या वृध्द आई 26 मे रोजी रात्री 8 वाजता पायी जात असताना अज्ञात 2 जणांनी त्यांच्या गळ्यातील 1 लाख 30 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन ओढून चोरून नेली. ही घटना घडल्यानंतर विनोद बाविस्कर यांनी बुधवार 29 मे रोजी दुपारी 3 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात दोन जण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील…

Read More

भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ शहरात पुन्हा एकदा गोळीबार करण्याची धक्कादायक घटना समोर आलो आले. यामुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली आले. यात दोन जण गंभीर जखमी झाले आल्याचे समोर आले आहे. बुधवारी २९ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्याच्या सुमारास भुसावळ शहरात गोळीबार झाला. यात सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक संतोष बारसे तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना शहरातील जुना सातारा परिसरातील मरिमाता मंदिर परिसरात खळबळजनक घटना समोर आली आले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहे.

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी । गिरणा नदीत मुलांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे गावातील यश राजेंद्र पवार वय ८ रा. वरखेडे ता. चाळीसगाव या चिमुकल्याचा बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यश पवार हा बालक आपल्या पालकांसोबत चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथे वास्तव्याला आहे. मंगळवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता गावाजवळ असलेल्या गिरणा नदी पात्रात पोहण्यासाठी गावातील काही मुलांसोबत गेलेला होता. तो पाण्यात पोहण्यासाठी उतरला असता तो पाण्यात वाहून गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना लक्षात आल्यानंतर मुलांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरात ग्रामस्थांनी धाव घेवून त्याला बाहेर काढले. त्याला तातडीने मेहुणबारे ग्रामीण रूग्णालयात दाखल…

Read More

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील शिंदी गावात ईलेक्ट्रीक खंब्यावर काम करत असतांना ईलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने सुनिल अशोक सपकाळे वय ४५ याचा खंब्यावरून खाली पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुनिल सपकाळे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. मंगळवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता ते ईलेक्ट्रीक पोलवर काम करत असतांना त्यांना विजेचा धक्का बसला. त्यात ते पोलवरून खाली पडले, यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाले. त्यांना तातडीने वरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

Read More

मुंबई वृत्तसेवा । गेल्या महिन्यापासून राज्यात उष्णता प्रचंड वाढली आहे, दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दुसरीकडे अनेक शहरांमध्ये ५० अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. दरम्यान आता सर्वांसाठी एक आनंदाची बातमी देखील आहे. हवामान खात्यानुसार येत्या २४ तासात मान्सू केरळ किनारपट्टीवर दाखल होत आहे. त्यामुळे आता पुढील आठवड्यात मान्सू दाखल होत असल्याने लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या उत्तर आणि मध्य भारतातील राज्यांसाठीही हवामान खात्याने दिलासादायक बातमी दिली आहे. ३० मेपासून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव काहीप्रमाणात कमी होण्यास सुरुवात होणार आहे. हवामान खात्याने म्हटले की, पुढील एका आठवड्यात ईशान्येकडील राज्यांमध्ये चांगला पाऊस होईल.…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शासकीय दराची किंमत ठरलेली असतांना जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्या म्हसावद येथील कृषी केंद्र चालकावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे कृषी केंद्रचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलाय खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाण्यांची कृत्रिम टंचाई दाखवून, अनेक बियाणे विक्रेत्यांकडून बियाणे जादा दराने विक्री होत असल्याचे प्रकार घडत आहे. हा प्रकार रोखण्यासाठी कृषी विभागाकडून १६ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकाकडून गेल्या आठवड्यात २३ मे रोजी दुपारी दीड वाजता जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील भुषण कृषी केंद्रावर धाड टाकली होती. या ठिकाणी ८६४ रुपयांच्या बियाण्याची विक्री १२०० रुपयांमध्ये होत असल्याचा…

Read More

अमळनेर प्रतिनिधी । अवैधपणे गुरांची वाहतूक करणारे पिकअप वाहन पोलीसांनी पकडले असून तीन गायींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीसांनी सावखेडा शिवारातील कुसुमाई पेट्रोलपंपाजवळ केली आहे. याबाबत अधिक असे की, सावखेडा शिवारातील कुसुमाई पेट्रोलपंपाजवळून गुरांची अवैधपणे वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने मंगळवारी २८ मे रोजी पहाटे ४ वाजता कारवाई करत पिकअप वाहन क्रमांक (एमएच २० ईएल ४३२८) पकडले. वाहनाची तपासणी केली असता तीन गायींना निर्दयीपणे बांधल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीसांनी वाहन जप्त केले…

Read More