Author: user

जळगाव प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील आसोदा येथे प्रसिद्ध निर्भय हॉटेलचे मालक खेमचंद ज्ञानेश्वर चौधरी वय-२७ यांनी त्यांच्याच हॉटेलमध्ये छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार ३१ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. दरम्यान याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खेमचंद ज्ञानदेव चौधरी (रा.असोदा ता. जळगाव) असे मयत व्यावसायिकाचे नाव आहे. तो असोदा गावामध्ये आई, पत्नी, एक मुलगा, भाऊ, वहिनी यांच्यासह राहत होता. नवनाथ मंदिराजवळ असलेल्या हॉटेल निर्भयचा खेमचंद हा मालक होता. हॉटेल व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. अनेक दिवसांपासून त्याला आर्थिक समस्या भेडसावत होती, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून…

Read More

जळगाव प्रतिनिधी |जळगाव शहरातील मेस्को माता नगरात घरासमोर पार्कींगला लावलेली दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेस्को माता नगरात मयुर अनिल सोळंखे वय २४ रा. कोळनाव्ही ता. यावल ता तरूण वास्तव्याला आहे. २८ मे रोजी दुपारी २.३० वाजता त्यांची दुचाकी (एमएच १९ डीडब्ल्यू ६०१६) ही घरासमोर पार्कींगला लावलेली होती. घरासमोर उभी असलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतला. या आगीत दुचाकी जळून खाक झाली आहे. आग लागल्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी मयुर सोळंखी याने पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार गुरूवारी ३० मे रोजी दुपारी दीड…

Read More

भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ शहरातील तापी पुलावर भरधाव कारने धडक दिल्याने दुसखेडा पेपर मिलचा कर्मचारी जखमी झाला व दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले. हा अपघात शुक्रवार २४ मे रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी गुरूवारी ३० मे रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ शहर पोलिसात कार चालकाविरोधात गुन्हा दाखलल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, ओम उर्फ आकाश नंदकुमार पाटील (वय-32, दुसखेडा पेपर मिल, ता.यावल) या तरुणाच्या तक्रारीनुसार, शुक्रवार २४ मे रोजी तापी पुलावरून दुचाकीने जात असताना भरधाव कार (एम.एच.04 ई.एच.4708) वरील अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भराधाव वेगाने कार चालवून दुचाकीला धडक दिल्याने हाताच्या पंजाला व दोन्ही पायांच्या…

Read More

अमळनेर प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील झाडी गावातील ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हा हाडांसह विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना गुरूवारी ३० मे रोजी दुपारी १२ वाजता झाडी शिवारातील शेतात आढळून आला. याप्रकरणी दुपारी ४ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नाना रामदास पाटील वय ५५ रा. झाडी ता. अमळनेर असे मयताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील झाडी गावात नाना पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. दरम्यान, झाडी शिवारातील त्यांच्या शेतात नाना पाटील यांचा मृतदेह हा हाडांसह विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना गुरूवारी ३० मे रोजी दुपारी १२ वाजता समोर आले आहे. हा प्रकार…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील एफ सेक्टरमधील अमित रोलींग मिल कंपनीच्या गोडावून मधील वेस्टेज असलेल्या पुठ्ठ्याच्या टाक्यांना अचानक आग लागून नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी ३१ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली आहे. या घटेनची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे अग्निशमनचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव एमआयडीसीतील एफ-२८ मधील अमित रोलींग मिल कंपनी आहे. या कंपनीच्या गोडावूनमध्ये पुठ्ठ्याच्या रिकाम्या लहान टाक्या ठेवण्यात आलेल्या आहे. शिवाय काही वेस्टेज असलेल्या केमीकलच्या टाक्या देखील याच ठिकाणी ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी ३१ मे रोजी सायंकाळी ६.३०…

Read More

इंदौर वृत्तसेवा । अंगावर लष्काराचा गणवेश व हातात तिरंगा घेवून मॉ तुझे सलाम चं गाणं म्हणतांना माजी सैनिकाचा मंचावर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. दरम्यान हा अभिनय करतांना ते खाली कोसळले असतांना उपस्थितांना टाळ्या वाजविल्या, परंतू माजी सैनिकाने जगाचा निरोप घेतला होता. इंदौरच्या फुटी कोठी येथील ही घटना आहे. योग क्षेत्रात काम करणाऱ्या एका संस्थेच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात माजी सैनिक बलजीत हे आपल्या टीम सोबत आले होते. त्यांना या कार्यक्रमात सादरीकरण करत असतांना तिथे देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर मेरी आन तिरंगा है, वंदे मातरम.. आदी गाण्यांवर अनेकांनी परफॉर्मन्स दिला. बलजीत यांनी या कार्यक्रमात भाग…

Read More

मुंबई वृत्तसेवा । भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी एका मोठा गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेस पक्षातील एक मोठा नेता ४ जून नंतर भाजपात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार आहे. निवडणुकीच्या काळात आम्हाला काँग्रेसमधील अदृश्यशक्तींनी मदत केलीय, असा दावाही नितेश राणे यांनी केला आहे. ते मीडियाशी ते बोलत होते. नुकतेच नितेश राणे हे सहकुटुंब शिर्डीला आले होते. साईबाबांच्या दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साईबाबांचे आशीर्वाद राहावे आणि पुन्हा त्यांच्याकडेच देशाचे नेतृत्व करतील अशी प्रार्थना त्यानी केली आहे. येत्या ४ जून रोजी महायुती अत्यंत ताकदीने निवडून येणार आहे. राज्यातील…

Read More

पंढरपूर प्रतिनिधी । महाराष्ट्राचे दैवत पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिरात एक तळघर आढळून आले आहे. या तळघरात पुरातन मूर्ती व पुरातन वस्तू सापडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने घटनास्थळी धाव घेतली असून चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. तळघरात काय सापडणार याकडे संपूर्ण विठ्ठल भक्तांचे लक्ष लागले आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदीरात एक तळघर आढळून आले. पुरातत्व विभागाचे अधिकारी, मंदिर समितीचे अधिकारी तसेच मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत येथे काम सुरु केले असून आतापर्यंत यामध्ये विष्णूची मूर्ती, पादुका, एक लहान मूर्ती आणि काही नाणी सापडल्याची माहिती आहे. विठ्ठल मंदिरात सध्या संवर्धनाचे काम सुरु आहे. या दरम्यान हे तळघर…

Read More

जळगाव प्रतिनिधी । तुकारामवाडी परिसरात दहशत निर्माण करून मारहाण, शिवीगाळ असे वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार भुषण उर्फ भासा विजय माळी (वय २४, तुकारामवाडी, जळगाव ) यांच्यावर एमपीडीए कायद्यांर्गत कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरूवारी आदेश काढलेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यात हद्दीत राहणारा भुषण माळी याच्या विरुध्द वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची तुकारामवाडी व परिसरात प्रचंड दहशत होती. त्याच्या व त्याच्या टोळीच्या नावाची दहशत निर्माण करत सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण मारहाण करुन, शिवीगाळ करण्याचेही अनेक प्रकार केले. त्याच्या विरुध्द भूषण माळी यांच्यावर एकूण १३ वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याची गंभीर…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी जनजागृती बरोबर उपाययोजना करणे गरजेचे असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बायपास रस्ता तात्काळ व्हावा, म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. हेल्मेट घालणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असल्यामुळे इथून पुढे ती सवय लागावी म्हणून इथून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी ३१ मे रोजी दुपारी २ वाजता यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, राज्य परिवहन मंडळाचे वाहतुक अधिकारी दिलीप बंजारा, राष्ट्रीय महामार्गचे अभियंता सुनील गजरे, बांधकाम विभागाचे अभियंता आर. व्ही. बिऱ्हाडे यांच्यासह विविध वाहतूक संघटनांचे,स्वयंसेवी…

Read More