नवरात्रीत नऊ दिवस अनेक जण अगदी भक्तिभावाने उपवास करतात. काहीजण तर निर्जळी किंवा काहीजण उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात. उपवासाचे पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी, भगर, असे पदार्थ खाल्ले जातात. पण राजगिऱ्याचे थालीपीठ तुम्ही उपवासाला बनवून खाऊ शकतात. अगदी सोप्पी अशी याची रेसिपी आहे. राजगिऱ्याचे थालीपीठ घरी कसे बनवले जाते हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. साहित्य राजगिऱ्याचं पीठ, बटाटे, मिरच्या, शेंगदाण्याचा कूट,आल्याची पेस्ट, कोथिंबीर, मीठ कृती सर्वप्रथम, एका भांड्यात राजगिऱ्याचं पीठ घ्यावे. यामध्ये किसून घेतलेले बटाटे टाका. यानंतर त्यामध्ये कोंथिबीर, शेंगदाण्याचा कूट, मिरच्या आणि एक चमचा आल्याची पेस्ट टाका. आता यामध्ये चवीनुसार मीठ घेऊन सर्व राजगिऱ्याच्या पिठात मिक्स करा.…
Author: Team Live Maharashtra News
आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. अशातच कसारा घाटात बुधवारी रात्रीच्या सुमारास 300 फूट खाेल दरीत मालवाहतुक काेसळून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातग्रस्तस्थळी पाेलीसांनी अपघातग्रस्त भागाची पाहणी केली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालवाहतुकीची गाडी 300 फुट दरीत कोसळली. कसारा घाटात मुंबईहून नाशिकच्या दिशेने हि गाडी जात होती. या अपघातात चालकाचा तसेच अन्य एकाचा मृत्यू झाला. यावेळी चालकाचा मृतदेह आपत्ती व्यवस्थापन सदस्यांच्या मदतीने पाेलीसांनी दरीतून बाहेर काढला.
दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. आजचे बारा राशींचे भविष्य जाणून घ्या महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून. मेष रास आज अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींना साधनेसाठी अनुकुल दिवस आहे. विद्यार्थ्यांना आजचा दिवस यश देणारा असेल. वृषभ रास आजच्या दिवस प्रवास टाळणे फायदेशीर ठरेल. कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल. नोकरीत अनेकांचे सहकार्य मिळेल. सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक हानी होईल. मिथुन रास रोजगारात नवीन योजना आखाल. यश मिळेल. नोकरीत आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर फारसे विसंबून…
विद्यार्थ्यांना हवेहवेसं वाटणारं…भिंतीवर रंगवलेली फुलं-झाडं आणि गणितांची कोडी…खिडक्या, दरवाजे, व्हरांडा, जिकडे-पाहावे-तिकडे रंगेबेरंगी चित्रे, तक्ते, सुभाषिते, नकाशे यांची पखरण…विद्यार्थ्यांसोबत बोलणाऱ्या भिंती अन् व्हरांडा हे चित्र जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये साकार होत आहे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि लहान मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी ‘बाला’ म्हणजेच ‘बिल्डिंग एज लर्निंग एड’ उपक्रम जळगाव जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविला जात आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीद्वारे जिल्ह्यातील २७८ शाळांमध्ये बाला प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. त्यापैकी ३६ शाळांचे कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. जामनेर तालुक्यात ३१ शाळांमध्ये बाला प्रकल्प राबविण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी ६ शाळांमधील कामे पूर्ण…
बॉलिवूड मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेते कुंद्रा जॉनी यांचे निधन झाले आहे. केरळमधील कोल्लम येथे एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. यामुळे साऊथ सिनेसृष्टीला शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मंगळवारी अभिनेते कुंद्रा जॉनी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला यानंतर त्यांना लगेचच एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूड मध्ये शोककळा पसरली असून त्यांचे चाहते आणि कलाकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. प्रसिद्ध अभिनेते कुंद्रा जॉनी यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भुमिका साकारुन मल्याळम चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. तसेच त्यांनी ’15 ऑगस्ट’, ‘हॅलो’,…
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात हळू चालणारा ग्रह आहे. शनी सध्या स्वतःच्या राशी कुंभ राशीत आहे. शनी कोणत्याही एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. शनीच्या राशी बदलामुळे काही राशींच्या लोकांना आनंदाचे दिवस येणार आहेत. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मिथुन रास या काळात मिथुन राशींच्या व्यतींसाठी हा काळ विशेष लाभदायक असणार आहे. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होईल. आरोग्यात सुधारणा होईल. व्यवसायात प्रगती होईल. कन्या रास कन्या राशींच्या लोकांना हा काळ शुभ असणार आहे. व्यवसायमध्ये तेजी येईल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. घरात धार्मिक कार्याचे आयोजन केले जाईल. तूळ…
जवळपास सगळ्यांनाच पराठा आवडत असतो. म्हणजे मेथी पराठा, आलू पराठा, चीझ पराठा, हे आवडणारे पराठे आहेत. पण तुम्ही कधी पनीर पराठा ट्राय केला आहे का नसेल केला तर पनीर पराठा आजच घरी करून पहा. पनीर पराठा घरी कसा बनवायचा हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. साहित्य पनीर, गव्हाचे पीठ, लाल तिखट, हिरवी मिरच्यांची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, आले, कोथिंबीर, धनेपूड, जिरेपूड, हळद, तेल, तूप, लिंबूचा रस, मीठ कृती सर्वप्रथम, सुरुवातीला पनीर बारीक किसून घ्यावे. त्यात लाल तिखट, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, हळद, मीठ टाकावे. बारीक चिरलेला कांदा त्यात टाकावा धनेपूड, जिरेपूड आणि लिंबाचा रस त्यात टाकावा. वरुन कोथिंबीर टाकावी आणि…
आपण चांगलं शिकावं आणि चांगली नोकरी करावी असं आपल्याला वाटत असत. कित्येक जण सरकारी नोकरी मिळावी यासाठी धडपडत असतात. रात्रंदिवस एक करून अभ्यास करत असतात. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात विविध पदे भरण्यासाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज कसा करावा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती हे सर्व काही जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूज च्या माध्यमातून. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 532, कनिष्ठ अभियंता (विद्युत) 55, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 05, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1378, लघुलेखक (उच्च श्रेणी) 08 लघुलेखक (निम्न श्रेणी) 02, उद्यान पर्यवेक्षक 12, सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 09, स्वच्छता निरीक्षक 01, वरिष्ठ लिपिक 27,…
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास आज अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये बदल होतील. कौटुंबिक नात्यात गोडवा वाढेल. आज तुम्हाला विविध स्त्रोतांकडून लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. आज तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तब्येतीची काळजी घ्यावी. वृषभ रास आजचा दिवस वृषभ राशींच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. नवीन संधी मिळतील. मिथुन रास मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळेल. कामे वेळेवर पूर्ण…

