जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. म्हशी गावठाण जागेत चरत असताना अचानक विजेचा धक्का लागून तीन म्हशी जागेवरच ठार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान यामध्ये सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भैय्यासाहेब पाटील पारोळा तालुक्यातील कंकराज येथे हे वास्तव्यास आहेत. कंकराज शिवारात म्हशी दुपारी चरत होते. यावेळी अचानक इलेक्ट्रिक तारांचा म्हशींना जोरदार शॉक लागला, या घटनेत म्हशींचा विजेच्या धक्क्याने जागीच दुर्देवी मृत्यू झाला. याबाबत पारोळा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
Author: Team Live Maharashtra News
आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. अशातच जळगावातून एका अपघाताची बातमी समोर येतेय. भरगाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भूषण उत्तम मोरे हा परिवारासह अमळनेर मध्ये वास्तव्यास आहे. भूषण उत्तम मोरे हा आपल्या आईसह रविवारी अमळनेर इथे जात असताना समोरून येणाऱ्या कारने भूषण उत्तम मोरे यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात भूषण उत्तम मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या आईचा दुर्देवी मृत्यू झाला.…
बांग्लादेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांगलादेशमध्ये दोन रेल्वे एकमेकांना धडकल्या असून यात कमीतकमी वीस लोकांचा मृत्यू झाला आहे. हे प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वे एकमेकांना धडकल्याची माहिती आहे. राजधानी ढाका जवळ कृष्णगंज जिल्ह्यातील ही घटना आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे कि, प्रवासी रेल्वे कृष्णगंज ते ढाका येथे जात होती त्यावेळी हा भीषण अपघात झाला. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा अपघात दुपारी साडेतीनच्या दरम्यान झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु झाले आहे. जखमींना जवळच्या ह़ॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अनेकांची स्थिती गंभीर…
टाकरखेडे ता.एरंडोल येथे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात रोटरी क्लब जळगाव वेस्ट यांच्या संकल्पनेतून व ग्रामपंचायत यांच्या अनमोल सहकार्याने संपूर्ण गावातील लोकांची महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील सर्व लोकांची जनरल,नेत्र,दंत,नाक,कान, घसा,हाडांची तपासणी, लहान बालक व स्रियांचे विविध आरोग्यविषयक समस्या यांची तपासणी करण्यात येऊन गरजेनुसार मोफत औषधींचे वितरण करण्यात आले. तसेच ज्यांना पुढील उपचाराची गरज असेल त्यांना सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यावेळी हिमोग्लोबिनची तपासणी करून 106 ब्लड सॅम्पल गोळा केले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांचा रक्तगट देखील तपासण्यात आला.यावेळी जळगावातील नामांकित डॉ.राजेश पाटील,डॉ.गिरीश नारखेडे,डॉ. सुशिल राणे,डॉ.आनंद दसपुत्रे, डॉ.चेतना पाटील,डॉ.दर्शना शहा,डॉ.कल्पेश गांधी,डॉ.नेहा भंगाळे,डॉ.मोनिका जाधव,डॉ.प्रीती…
नवरात्रीचा उपवास पूर्ण नऊ दिवस केला जातो. भाविक पूर्ण भक्तिभावाने नवरात्रीचे उपवास करत असतात. उपवासाला साबुदाणा, साबुदाणा वडा, यासारखे पदार्थ खाल्ले जातात. पण सारखं तेच तेच खाणं कंटाळवाणं झालं असेल तर तुम्ही उपवासाची मिसळ सुद्धा घरी करू शकतात. उपवासाची मिसळ घरी कशी बनवली जाते हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. साहित्य शेंगदाणे, साबुदाणा, मिरच्या, जीरे, दही बटाटा भाजी, फराळी चिवडा, मीठ, तूप कृती उपवासाची मिसळ’ बनवण्यासाठी सर्वात आधी साबुदाण्याची खिडची करुन घ्यावी. शेंगदाणे, मिरची, मीठ वाटून त्याची आमची बनवून घ्यावी. आमटीला तूप आणि आमसूलाची फोडणी घालावी. एका मोठ्या भांड्यात खिचडी. बटाटा भाजी आणि शेंगदाण्याची आमटी एकत्र करावी. त्यावर गोडसर…
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल असणार आहे. ऑफिसमधील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि तुम्हाला मोठ्यांचा आशीर्वादही मिळेल. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस संमिश्र पद्दतीचा असेल. कुटुंबातील सर्वांशी समन्वय ठेवा. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळतील. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. व्यावसायिकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी नफा-तोटा जाणून घ्यावा. आज तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय…
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. इंडियन ऑइलमध्ये 1720 पदांवर भरती होणार असून यासाठी नोंदणी 21 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाली आहे.अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 24 वर्षे आहे. नियमानुसार SC/ST/OBC (NCL) /PWD उमेदवारांसाठी वयात सवलत लागू आहे. तर या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे तसेच यासाठी अर्ज कसा करावा हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. ट्रेड अप्रेंटिस – अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) – केमिकल ४२१ पदे, ट्रेड अप्रेंटिस (फिटर) – मेकॅनिकल 189 पदे, ट्रेड अप्रेंटिस (बॉयलर)…
दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. यावर्षीचा दसरा खास असणार आहे. कारण तूळ राशीत सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य योग निर्माण झाला आहे. हा बुधादित्य योग यामुळे काही राशींना याचे शुभ फळ मिळणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. कर्क रास या काळात कर्क राशींच्या लोकांना या योगाचा विशेष लाभ होणार आहे. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. नोकरी करणाऱ्या जातकांना अचानक धनलाभ होईल. विद्यार्थ्यांना हा काळ यश मिळवून देणारा ठरेल. तूळ रास या काळात तूळ राशींच्या लोकांना विशेष लाभ होईल. सगळे काम नियोजित वेळेवर पूर्ण होतील. कौटुंबिक स्तरावर आनंदी वातावरण…
नवरात्रीत भाविक उपवास करत असतात. संपूर्ण नऊ दिवस भाविक भक्तिभावाने उपवास करतात. उपवासाला साबुदाणा खिचडी, भगर, राजगिऱ्याचे लाडू असे पदार्थ खाल्ले जातात. पण तुम्हाला उपवासाला काही वेगळं खावंसं वाटत असेल तर दह्यापासून बनवलेली थंडगार लस्सी उपवासाला पिऊ शकता. लस्सी घरी कशी बनवायची हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. साहित्य दही, दह्याची साय, दुध, साखर, सुका मेवा कृती सर्वप्रथम, घट्ट दहीमध्ये दुध घालावे त्यामध्ये साखर घालावी आणि मिक्समध्ये घुसळून घ्यावे. हे सर्व मिश्रण ग्लासमध्ये भरावे आणि त्यावर दह्याची साय टाकावी. आवडीनुसार सुका मेवा टाकावा आणि केशर घालावी. तयार आहे थंडगार लस्सी.
जळगाव. कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाराष्ट्र सायबर सेल आणि क्विक हिल फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 20th ऑक्टोबर रोजी सायबर सुरक्षा जनजागृती महीण्याच्या अनुषंगाने नाटीका, पोस्टर विविध प्रकार जनजागृती करण्यात आली. विद्यापीठातील संगणकशास्त्र प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून समन्वयक राजु आमले यांचा मार्गदर्शनाखाली नाटीका, पोस्टर प्रेजेंटेशन, Quiz competition इ. स्पर्धांचे आयोजन करून यशस्वीरीत्या पार पाडले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परीसरात फिरून संपूर्ण शिक्षक, कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांना सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करून माहीती पुस्तीका download करून दिली. कार्यक्रमात स्वयंसेवक गायत्री ठाकरे, श्रेया भोंबे, कुणीका बैरनार, दर्शना हिरे, तेजल कोल्हे अंशीका गुप्ता व राजश्री कापुरे यांनी फोटो मॉर्फिंग या fraud…

