तुम्हाला जर बँकेत काम करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र’ मध्ये भरती सुरु झाली आहे. या भरतीची नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र’ मध्ये एकूण १०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज कसा करावा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. क्रेडिट ऑफिसर स्केल– ५० जागा या पदांसाठी जागा भरणे आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण तसेच बँकिंग क्षेत्रातील पदव्युत्त पदवी, एमबीए फायनान्स, बँकिंग आणि अन्य काही शाखांमधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. क्रेडिट ऑफिसर…
Author: Team Live Maharashtra News
उत्तरप्रदेश मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. सासूने आपल्याच सुनेची हत्या केल्याची घटने घडली आहे. या घटनेत सुनेचा जागीच मृत्यू झाला. स्वाती वय वर्ष ३२ असे मयत सुनेचे नाव आहे. लग्नाच्या दीड वर्षानंतर स्वाती आठ महिलांच्या गरोदर होत्या. दरम्यान सुनेची हत्या केल्यानं पोलिसांनी सासूला ताब्यात घेतलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, या सासू सुनेमध्ये बुधवारी काही कारणावरून भांडण झाले होते. याच रागाच्या भरात सासूने घरात असलेला दगडी वरवंटा सुनेच्या डोक्यात घातला आणि या घटनेत सून गंभीर जखमी झाली. दरम्यान तिच्या पतीने तिला तात्काळ रुग्णालयात हलवले पण उचारादरम्यान तिचा दुर्देवी मृत्यू झाला. सुनेच्या कुटुंबियांना या बद्दल माहिती मिळाल्यावर त्यांनी प्रचंड…
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील. आरोग्य चांगले राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आपल्या आहाराची काळजी घ्या वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस अनुकूल असेल. कुटुंबातील सर्वांशी समन्वय ठेवा. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळतील. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. व्यावसायिकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी नफा-तोटा जाणून घ्यावा. आज तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल.…
भंडारा मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १४ महिन्यांच्या चिमुकल्याचा अंगणातील पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अदिक अतुल शहारे असे १४ महिन्यांच्या असे मयताचे नाव आहे. अदिकची आई घरकामात असताना त्यांनी अदिकला शेजाऱ्यांच्या घरी नेले होते. आणि आदिकचे वडील कामासाठी बाहेर होते. घराशेजारील असलेल्या घराकडून अदिक खेळत-खेळत आपल्या घराकडे आला. खेळता खेळता आदिक हा अंगणातील पाण्याच्या टाकीजवळ गेला. दरम्यान टाकीचे झाकण उघडे असल्याने त्याचा पाय घसरून बुडून मृत्यू झाला. यानंतर अदिकचे वडील घरी आल्यानंतर शेजारच्यांना अदिक कुठे आहे असे विचारले यावर…
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल असणार आहे. कला आणि संगीत क्षेत्रात उच्च पातळीवरील यश मिळविण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतील.आरोग्य चांगले राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस संमिश्र पद्दतीचा असेल.आज आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण होईल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यावसायिकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी नफा-तोटा जाणून घ्यावा. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. कर्क रास कर्क…
30 ऑक्टोबरला राहु आणि केतु राशी परिवर्तन करणार असून राहु मेष राशीतून मीन राशीत, आणि केतु तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ह्या गोचरामुळे काही राशींना नशिबाची उत्तम साथ मिळेल तसेच खूप दिवसांपासून असलेल्या इच्छा पूर्ण होतील. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी. मेष रास या काळात मेष राशींच्या लोंकाना भरपूर फायदा होईल. नशिबाची साथ मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात भरपूर प्रमाणात नफा होईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. वृषभ रास या काळात वृषभ राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पनाचे नवे मार्ग सापडतील. कुटुंबासोबत सहलीला जाण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या तक्रारी…
एक मोठी बातमी समोर येतेय. प्रसिध्द कीर्तनकार बाबा महाराज सातारकर याचं निधन झालं आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राच्या गावागावात त्याचं किर्तन ऐकलं जात होतं, महाराष्ट्राच्या खेडोपाड्यापर्यंत त्यांचं नाव घेतलं जात. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी नवी मुंबईतील नेरुळ येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी ३ वाजेनंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार आहे. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रसिध्द कीर्तनकार…
राज्यात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किमान आणि कमाल तापमानात घट होण्याची शक्यता असून १५ नोव्हेंबर च्या पुढे थंडी वाढेल असा अंदाज हवामान तज्ञ व्यक्त करत आहेत. जम्मू कश्मीरमध्ये सुरू झालेल्या बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रात देखील उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले आहे. राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचे रात्रीचे तापमान 17 अंशावर होते त्यापेक्षा दोन अंशांनी म्हणजे जळगावचे तापमान कमी म्हणजेच 15 वर्षांवर होते. तर दुसरीकडे दिवसाचे तापमान 35 वर्षांमुळे दिवसा उकाडा जाणवत आहे. एकीकडे दिवसा जास्त तर रात्री कमी होणारे तापमान अशी स्थिती सध्या राज्यात आहे. समुद्राच्या पाण्याच्या तापमानात फारसा फरक दिसून येत नसल्याने थंडीवरही फारसा परिणाम जाणवणार नाही. 15…
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सोळा दिवसांपासून आदिवासी कोळी समाजातर्फे विविध मागण्यांच्या संदर्भात आमरण उपोषण सुरू आहे. बुधवारी इंदुबाई बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे शासनाला साडी, चोळी, बांगड्यांचा आहेर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्याचा प्रयत्न पोलिसांच्या प्रयत्नाने फासला; पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत हे साहित्य जप्त केले. नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे १० ऑक्टोबरपासून आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जमातीचा दाखला, जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू आहे. बुधवारी, दि. २५ रोजी, इंदुबाई बहुउद्देशीय मंडळातर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन व साडी-चोळी, बांगड्या देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी महिला आंदोलनकर्त्यांना साडी-चोळी व…
दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. आजचे बारा राशींचे भविष्य जाणून घ्या महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून. मेष रास आजचा आपला दिवस अनुकूल असेल. नोकरीत कामाचा ताण राहील. तब्येतीत सुधारणा दिसून येईल. व्यवसायाबाबत नवीन कल्पना तुमच्या मनात येतील.त्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न कराल. वृषभ रास आज नोकरीत तुम्हाला अनेकांचे सहकार्य मिळेल तसेच कामे वेळेवर पूर्ण होतील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. आरोग्याच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन रास आजचा दिवस सर्व बाजूनी चांगला आहे. मुलाखती मध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मन लागेल. आरोग्याची काळजी घ्या. वाहने सावकाश चालवा. कर्क रास आज…

