Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एरंडोल – पिंपलकोठा गावाजवळ अपघात,दोन युवक जागीच ठार..!
    एरंडोल

    एरंडोल – पिंपलकोठा गावाजवळ अपघात,दोन युवक जागीच ठार..!

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 16, 2023Updated:January 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगावकडून एरंडोलकडे भरधाव वेगाने जाणारी कार व दुचाकी यांचा अपघात होऊन २ जण जागीच ठार झाले तर १ युवक गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर पिंपळकोठा गावापासुन थोड्या अंतरावर सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

    एम.एच.१५ एच.वाय ०७०० ही मर्सिडीज गाडी जळगाव कडून नाशिककडे भरधाव वेगाने जात होती. या गाडीने नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीस धडक दिल्याने त्यात नितिन जामसिंग पाटील वय-२१वर्षे व घनश्याम भानुदास बडगुजर वय-२०वर्षे हे दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच गतप्राण झाले. याशिवाय ज्ञानेश्वर गणसिंग पाटील वय २२वर्षे हा पादचारी युवक गंभीर जखमी झाला.

    यावेळी माजी जि.प.सदस्य नानाभाऊ पोपट महाजन, अशोक पाटील, राजेंद्र पाटील, मनोज पाटील, हरीभाऊ महाजन, अशोक बडगुजर व इतर ग्रामस्थांनी मदतकार्य केले. ज्ञानेश्वर पाटील या युवकास पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. विशेष हे की, ज्ञानेश्वर पाटील हा २१जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.