Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दिपाली सय्यद उर्फीवर आक्रमक ; तिला रस्त्यावर येऊन…
    क्राईम

    दिपाली सय्यद उर्फीवर आक्रमक ; तिला रस्त्यावर येऊन…

    editor deskBy editor deskJanuary 13, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यामध्ये ट्विटरवर युद्ध सुरूच आहे. आता या वादावर अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “फॅशन करावी, फॅशनला मोठा वाव आहे. फॅशन कुठेही करू शकता, पण कुठेतरी एक मर्यादा असते. प्रोफेशनल आणि रिअॅलिटी यात फरत आहे. या गोष्टी समजणं गरजेचं आहे. उर्फीने हे समजून घेतलं पाहिजे. सगळेच जण या वादात उतरले आहेत, पण रबर ताणला की तुटतो.
    त्यामुळे तो तुटायच्या आता यावर निर्णय घेणं गरजेचं आहे. उर्फीला समजवायला हवं.” त्याचबरोबर उर्फीच्या या गोष्टीचं समर्थन करत नसल्याचंही दिपाली सय्यद यांनी स्पष्ट केलं. उर्फी जावेद तिचा उदरनिर्वाह करण्यासाठी ज्या गोष्टी करत आहे, त्या प्रोफेशनली करत आहे का? तिला रस्त्यावर येऊन फोटो काढण्याची परवानगी आहे का? असा सवाल दिपाली सय्यद यांनी केला आहे.

    जर तिला परवानगी मिळत असेल तर बोलण्यात काही अर्थ नाही, पण जर तिला परवानगी मिळत नसेल आणि अशा पद्धतीचे कपडे घालून ती रस्त्यावर शूट करत असेल तर ते चुकीचं असल्याची प्रतिक्रिया दीपाली सय्यद यांनी दिली. पुढे त्या म्हणाल्या, “सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकराचे कपडे घालणं योग्य नाही. शॉर्ट्स घालणं, फ्रॉक घालणं आणि उर्फी जे कपडे घालते त्यात फरक आहे. उर्फीचे कपडे ट्रान्सपरंट असतात, ते न घातल्यासारखेच असतात.” असे कपडे घालायला हिम्मत लागते. तिच्यातल्या हिमतीला मी सॅल्यूट करते. पण याच हिमतीचा वापर तिने वेगळ्या गोष्टीसाठी केला तर ती खूप मोठी होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. :

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.