Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राष्ट्रीय पोषण आहार महिना निमित्त वावडद्यात कार्यक्रम संपन्न
    जळगाव

    राष्ट्रीय पोषण आहार महिना निमित्त वावडद्यात कार्यक्रम संपन्न

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 18, 2021No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी( प्रवीण पाटील) : पोषण अभियानाच्या अंमलबजावणीसाठी समाजाचा पोषण अभियान कार्यक्रमात सक्रिय सहभाग असणे अत्यावश्यक आहे जेणेकरून अंगणवाडी सेवा लाभार्थ्यांना पर्यंत प्रभावीपणे पोहचविता येतील सदर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सन 2018पासुन प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण आहार महीना म्हणून देशपातळीवर साजरा करण्यात येतो.त्याचे आज 18 रोजी राष्ट्रीय पोषण आहार महिना निमित्त वावडदा बिटच्यावतिने आयोजित  पोषण आहार कार्यक्रम संपन्न झाला.

    अंगणवाडी व मराठी शाळा येथे केंद्र शासनाच्या सुपोषित भारत(कुपोषण मुक्त भारत)या संकल्पनेवर आधारीत शासनाच्या विविध विभागांमध्ये अभिसरण पद्धतीने पोषण अभियान कार्यक्रम देश पातळीवर राबविण्यात येत आहे.

    याचाच एक भाग म्हणून आपल्या जळगाव तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पातील वावड्या बिट पर्यवेक्षिका अर्चना धानोरे  यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी जि.प.जळगाव अध्यक्षा.रंजना पाटील या होत्या तर प्रमुख अतिथी जळगाव जि.प.महिला व बालकल्याण उपकार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत साहेब,म.बा.सभापती ज्योती पाटील, जळगाव प.स.सभापती ललिता पाटील जळगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय चव्हाण सर म्हसावद आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ सागर नाशिककर, डॉ प्रशांत गर्ग बा.वि.प्र.अधिकारी सुधा गिंधेवार,वावडदा ग्रा.प.सरपंच राजेश वाडेकर व सर्व पर्यवेक्षिका व मान्यवरांच्या उपस्थितीत होते.
    कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिट पर्यवेक्षिका धानोरे यांनी केले. यावेळी मान्यवरांचे स्वागत वृक्ष रोप देऊन करण्यात आले.

    अधिकार व पदाधिकारी यांनी याठिकाणी अंगणवाडी सेविकांनी उभारलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेतल्यानंतर अंगणवाडीच्या बालकांचे आकार साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन व पाहणी केली. याचवेळी अंगणवाडी परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .या कार्यक्रमात मुख्य आकर्षण म्हणजे आयोजकांनी ठेवलेल्या स्पर्धा त्यात तीन गोष्टीवर आधारित अशा स्पर्धा होत्या त्यात सदृढ बालक, पोषण आहार व रांगोळी स्पर्धा होत्या याठिकाणी आलेल्या मान्यवरांनी तिघ ठिकाणी भेटी दिल्या व पाहणी केली यात मान्यवरांचे लक्ष वेधले ते रांगोळी स्पर्धेत सहभागी साक्षी पवार या तरुणीने रेखाटलेल्या स्री भ्रुण हत्या थांबवा या रांगोळीने यानंतर स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धेकांना पारितोषिक वितरण यात पोषण आहार स्पर्धेत 25स्पर्धक होते. या स्पर्धेत  प्रथम वर्षा पाटील दृतिय रुपाली पाटील तर तृतीय विमल शिंदे यांना देण्यात आले. रांगोळी स्पर्धेत प्रथम साक्षी पवार दृतीय रुपाली कचरे तर तृतीय अर्चना पाटील यांना देण्यात आले . सदृढ बालक स्पर्धेत सहभागी बालकांमध्ये 1वर्ष ते 3वर्ष वयोगटातील प्रथम क्रमांक पटकावला हर्षल गोपाळ वावडदा.दृतीय क्रमांक समर्थ राठोड विटनेर तांडा 3वर्ष ते 4वर्ष वयोगटातील प्रथम क्रमांक सलीम खाटीख पाथरी, दृतीय क्रमांक समिरशहा वराड 4वर्ष ते 6वर्ष वयोगटातील मुलांनमध्ये प्रथम राघव धाडी लोणवाडी व दृतीय रितिका चव्हाण सुभाषवाडी यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

    यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले यात वावडदे सरपंच वाडेकर सर ,प.स.सभापतीसौ.ललिता पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय चव्हाण तसेच जि.प.जळगाव महिला बालकल्याण उपकार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत यांनी पोषण आहार महिन्यांचे निमित्ताने आपण जो कार्यक्रम आपल्या बिटात आयोजित केला तो अतिशय चांगल्या स्वरूपात व कौतुकास्पद असा असल्याचा आपल्या मार्गदर्शनात उल्लेख केला व आपण जे मान्यवरांचे वृक्षांचे रोपे देऊन स्वागत केले


     जि.प.अध्यक्षा.रंजना पाटील यांनी आपल्या भाषणात पोषण आहार, रांगोळी स्पर्धा या सर्व उपक्रमांचे त्यांनी भरभरून कौतुक केले नंबर काढतांना मला काही सुचत नव्हते सर्वांनाच प्रथम क्रमांक द्यावा असे मला वाटत होते अशी भावना त्यांनी व्यक्त केली तसेच आपल्या गावात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीसव आशा वर्कर यांना सन्मानाची वागणूक द्या सहकार्य करा असे आवाहन केले काही अडचण आल्यास मला संपर्क करा असे सांगितले.

    कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शनात  सर्व उपस्थितांचे वावडदे बिट पर्यवेक्षिका अर्चना धानोरे  यांनी आभार मानले व कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025

    एकाच झाडावर प्रेमीयुगुलाने संपविले आयुष्य !

    December 2, 2025

    युगेंद्र पवारांच्या लग्नात ‘आत्याबाई’ सुप्रिया सुळे रंगल्या सणसणीत ठेक्यावर

    December 1, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.