मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय नेत्यांबाबत अपघाताचे सत्र सुरु आहे.हिवाळी अधिवेशन आटोपून सर्वच पक्षांतील आमदार आप आपल्या मतदार संघात पोहचले आहे. तर गेल्या काही दिवसापूर्वी भाजप आमदाराचा अपघात झाला होता. आता नुकतेच राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळीत येथे अपघात झाला आहे.
https://www.facebook.com/DPMunde/posts/pfbid0kWvWVB5Vkbdg4w9QUV25keqF4UBheeu1rEwd8kg1axX9ui3tv4XWKgsSXhpzbqYhl
या अपघातामध्ये मुंडे किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाहनचालकाचा ताबा सुटल्याने मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांच्या छातीली किरकोळ मार लागला आहे. डॉक्टरांना त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.



