Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » स्वतः च्या मुलांना जन्म द्या ; राऊतांची जोरदार टीका
    राजकारण

    स्वतः च्या मुलांना जन्म द्या ; राऊतांची जोरदार टीका

    editor deskBy editor deskDecember 30, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    पक्ष शिवसेना, नेते बाळासाहेब ठाकरे, पक्षाची कार्यालयं आमची… मग तुम्ही काय केलं? स्वतः च्या मुलांना जन्म द्या दुसऱ्यांची मुलं खेळवू नका, सेनाभवन घेणार असं बोलणाऱ्यांनी हिंमत असेल तर स्वतः चं सेना भवन निर्माण करावं, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय.

    महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरही राऊत यांनी भाष्य केलंय. बेळगावसह सीमा भाग हा केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी का होते आहे? तिथलं सरकार कानडी संघटना मराठी भाषा मराठी माणसावर अन्याय करत आहेत. सुप्रीम कोर्टाने ठेवण्याचे आदेश पाळले जात नाहीत. हा प्रदेश केंद्रासाठी करावा तिथल्या मराठी लोकांनवरील अन्याय थांबावे थांबावे ही त्यासाठी मागणी आहे, असं राऊत म्हणालेत. कर्नाटक सरकारने मराठी माणसांना संरक्षण द्यावं. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईमध्ये देशातील सर्व प्रांतातील लोक येऊन राहत आहेत. कानडी बांधव देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. आमचा कानडी लोकांना विरोध आहे का? नाही. मग मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी का केली जात आहे? अशी मागणी करणारे मूर्ख आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी कर्नाटक सीमाप्रश्नावर भाष्य केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. राऊतांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबाई यांच्या दुःखद निधन झाल्याच्या समजला आम्ही सगळे त्यांच्यासाठी प्रार्थना करत होतो.पण त्यांचं आज निधन झालं ते समृद्ध आयुष्य जगल्या त्यांना उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभलं.अत्यंत कठीण परिस्थितीत आपल्या मुलांचा संगोपन केलं मुलांना वाढवलं.र नरेंद्र मोदी हे पक्षाचे सर्वोच्च नेते झाले नंतर पंतप्रधान झाले. कितीही सर्वोच्चपदावर एखादी व्यक्ती पोहोचली तरी आईचं छत्र गमवतं वेदनादायी असतं. तेव्हा ती व्यक्ती अनाथ होते. संपूर्ण ठाकरे परिवार शिवसेना परिवार महाराष्ट्राची जनता या दुःखद प्रसंगी नरेंद्र मोदी यांच्या मोदी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असं राऊत म्हणालेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शहरात मोकाट कुत्र्यांचा रक्तरंजित धुमाकूळ; एका दिवसात २१ जखमी, प्रशासन झोपेत?

    April 26, 2026

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.