Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणांना संधी : नाशिक डाक विभागात थेट मुलाखती !
    राज्य

    तरुणांना संधी : नाशिक डाक विभागात थेट मुलाखती !

    editor deskBy editor deskDecember 14, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था 

    राज्यातील तरुणांना नुकतीच डाक विभागाने सुवर्ण संधी देवू केली आहे. नाशिक डाक विभागात टपाल जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट मुलाखतीद्वारे अभिकर्त्यांची (विमा एजंट) नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी दि.२७ मंगळवारी सकाळी अकरा वाजता प्रवर डाक अधीक्षक नाशिक कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन नाशिक टपाल विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे.

    अभिकर्ता पदासाठी पात्रता व अटी पुढीलप्रमाणे
    -उमेदवार दहावी अथवा समतुल्य परिक्षा पास असावा.
    -उमेदवाराचे वय १८ ते ५० दरम्यान असावे.
    -उमेदवारास संगणकाचे आणि स्थानिक ठिकाणांचे ज्ञान असावे.
    -उमेदवार कोणत्याही आयुर्विमा कंपनीचा एजंट नसावा.
    -उत्तीर्ण उमेदवारास पाच हजार रुपये राष्ट्रीय बचत पत्र (NSC) सुरक्षा ठेव स्वरूपात भरणे बंधनकारक असेल.
    -प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपाचा परवाना देण्यात येईल.
    -नंतर आयआरडीए परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारास कायम करण्यात येईल.
    -उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य व्यक्तिमत्त्व, परस्पर संवाद कौशल्य, जीवन विमाबाबत ज्ञान या आधारावर करण्यात येईल.
    -उमेदवाराने मुलाखतीस शैक्षणिक कागदपत्र, तीन फोटो, पॅन कार्ड व आधारकार्ड सहित स्वखर्चाने उपस्थित राहावे.
    -अर्जाचा नमुना प्रवर अधीक्षक कार्यालय नाशिक किंवा जवळच्या कोणत्याही पोस्ट कार्यालयात उपलब्ध आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कडक निर्देश !

    April 18, 2026

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026

    धार्मिक यात्रेवरून परतताना काळाचा घाला : जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील ३ जण ठार

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.