Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बहुउद्देशीय संस्थाध्यक्षसह मान्यवरानकडून पो नि हिरे याचा  सत्कार !
    अमळनेर

    बहुउद्देशीय संस्थाध्यक्षसह मान्यवरानकडून पो नि हिरे याचा  सत्कार !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 15, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक जयपाल हिरे याचा धरणगाव येथील प्रदेश तेली महासंघ युवक आघाडी जिल्हाध्यक्ष तर कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील पंढरीनाथ चौधरी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे चौधरी व इतर मान्यवर यांनी अमळनेर येथे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या कार्याचा गौरव म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची राज्याभिषेक फ्रेम देवून (12 सप्टेंबर) अमळनेर पोलिस निरीक्षक यांचा सत्कार करण्यात आला.

    अमळनेर तालुक्याचे नव्याने आलेले पोलीस निरीक्षक जयपाल हिरे एक कर्तव्यदक्ष अधिकारी तर गुन्हेगारांवर करडी नजर ठेवणारे म्हणून त्यांची ख्याती आहे. तर या आधी धरणगाव तालुक्यात देखील जयपाल हिरे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. म्हणूनच त्यांच्या कामाची दखल घेत या सत्काराचे आयोजन सुनील चौधरी व इतर मान्यवर यांच्याकडून अमळनेर शहरातील मुंदडा नगर या भागात करण्यात आलं होतं.  तर यावेळी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हिरे यांनीदेखील सुनील चौधरी यांच्या कार्याचं कौतुक करत शुभेच्छा दिल्यात,  मात्र यावेळी बोलताना त्यांच्या कार्याचा गौरव देखील केला आहे. तर सुनील भाऊ चौधरी यांच्या कार्याची समाजाला नेहमी दिशा मिळत असते असा देखील उल्लेख करायला जयपाल हिरे विसरले नाही. तर या सत्काराच्या निमित्ताने दोघांनीही एकमेकांच्या कार्याचं कौतुक केल्याचा प्रत्यय आला.

    तर या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी व इतर मान्यवर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास महाजन, माजी नगरसेवक अनिल महाजन, सुनील महाजन, भैय्या महाजन, नाना महाजन, फारुख पिंजारी, भरत मिस्त्री, राहुल महाजन, अनिल चौधरी, सुनिल चौधरी, गोपनीय विभागाचे दिपक माळी हे देखील उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सोलापुरात महिला महाराष्ट्र केसरीचा रणसंग्राम!

    March 3, 2026

    जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी न्याय क्रांती मोर्चा: विविध शैक्षणिक समस्यांविरोधात अभाविप आक्रमक

    February 28, 2026

    रंगांची उधळण, पण केसांचीही जपा काळजी; होळीपूर्वी आणि नंतर काय कराल?

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.