जळगाव : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेली राजकीय वादात आ.चव्हाण यांनी सातत्याने आ.खडसे यांच्या विरोधात भूमिका घेत त्यांना जिल्हा दुध संघात राहू न देण्याचा जसा विडाच उचलला होता. व निवडनुकीच्या निकालात झालेही तसेच समजा आ.मंगेश चव्हाण यांनी आ.खडसे यांच्या पत्नी मंदाकिनीताई खडसे यांचा दारूण पराभव केल्याचे चित्र समोर आले आहे.
जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकित दोन्ही पॅनलमध्ये चुरस वाढत असून आता मुक्ताईनगर मतदार संघातून समोरा समोर उभे असलेले उमेदवार आ.मंगेश चव्हाण यांच्या विरुद्ध दुध संघाच्या माजी संचालिका मंदाकिनीताई खडसे यांच्यात मोठी चुरस या निवडणुकीत दिसून आली. सातत्याने जिल्हातील सहकार क्षेत्रात आपला दबदबा ठेवणारे आ.खडसे यांना जिल्ह्यातील जिल्हा दुध संघातील त्यांचा रथ ओढत असलेल्या पत्नी मंदाकिनीताई खडसे यांना आता दुध संघाच्या विजयापासून आ.चव्हाण यांनी रोखले आहे. तर जिल्हा दुध संघात आता पालकमंत्री गुलाबराव पाटील व क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांचेच वर्चस्व प्रस्थपित होईल असे चित्र दिसू लागले आहे.



