जळगाव : प्रतिनिधी
जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकित दोन्ही पॅनलमध्ये चुरस वाढत असून आता महिला राखीवसाठी असणाऱ्या दोन जागांमध्ये सहकार पॅनल व शेतकरी पॅनलला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.या निवडणुकीत माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनीताई खडसे व आ.मंगेश चव्हाण यांच्यातील लढत हि तगडी असल्याने या जागेसाठी चांगलीच चुरस वाढत आहे.
आज सकाळ ७ वाजेपासून जिल्हा दुध संघाची मोजणी सुरू झाली असून यात महिला राखीवमधून शेतकरी विकास पॅनलच्या पूनम प्रशांत पाटील आणि छायाताई गुलाबराव देवकर यांचा विजय झाला आहे. याच विजयाने पाटील व देवकर परिवारातील सदस्यांनी जिल्हा दुध संघात प्रवेश केला आहे.


