Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यातील नेत्यांचे भवितव्य आज होणार मतपेटी बंद !
    जळगाव

    जिल्ह्यातील नेत्यांचे भवितव्य आज होणार मतपेटी बंद !

    editor deskBy editor deskDecember 10, 2022Updated:December 10, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विजय पाटील : जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी आज सकाळी आठ वाजेपासून जिल्ह्यातील सात मतदान केंद्रावर मतदानास सकाळपासून प्रारंभ झाला आहे. या निवडणुकीत जरी सहा आमदार चार माजी आमदार निवडणुकीत एकनाथराव खडसे विरुद्ध गिरीश महाजन अशी पाहिजे.

    जिल्हा दुध संघात आगामी पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली आहे. यात एकूण २० संचालकांची निवड करण्यात येणार असून यात पाचोरा तालुक्यातून माजी आमदार दिलीप वाघ हे आधीच बिनविरोध निवडून गेले आहेत. यामुळे १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. तर ४४१ मतदार आहे. यात प्रामुख्याने महाविकास आघाडीचे सहकार पॅनल आणि महायुतीचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत आहे. सहकार पॅनलची धुरा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे तर शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. शेतकरी पॅनलमध्ये दोन मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांचा उभे आहे. सहकार पॅनलमध्येही मावळत्या अध्यक्षा मंदा खडसे यांच्यासह मातब्बर नेत्यांचा समावेश आहे.

    असे आहे मतदान केंद्र
    अमळनेर व चोपडाच्या ७८ मतदारांसाठी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मतदान केंद्र आहे. भुसावळ, बोदवड व मुक्ताईनगरच्या ४४ मतदारांसाठी म्युन्सिपल हायस्कूल, जामनेर रोड भुसावळ हे मतदान केंद्र आहे. चाळीसगावच्या ५९ मतदारांसाठी हिरुभाई हिमाभाई पटेल प्रथमिक विद्यालय चाळीसगाव हे मतदान केंद्र आहे. एरंडोल, धरणगाव व पारोळाच्या ६७ मतदारांसाठी एरंडोल येथील सूर्योदय जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था, दत्त कॉलनी हे आहे. रावेर यावलच्या ६० जागांसाठी म्युन्सिपल हायस्कूल अँँड ज्युनिअर कॉलेज फैजपूर येथे मतदान होणार आहे. जळगाव व जामनेरच्या ५७ मतदारांसाठी मतदान केंद्र जळगाव येथील रिंग रोडवरील श्री सत्यवल्लभ हॉल हे असणार आहे. तर पाचोरा, भडगावच्या ७६ मतदारांसाठी श्री गो. से. हायस्कूल पाचोरा येथे मतदान केंद्र आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.