Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दिव्यांगांच्या प्रगतीसाठी शासन कटिबध्द असून धरणगावात अद्यावत स्वमिंग पूल उभारणार !
    जळगाव

    दिव्यांगांच्या प्रगतीसाठी शासन कटिबध्द असून धरणगावात अद्यावत स्वमिंग पूल उभारणार !

    editor deskBy editor deskDecember 3, 2022No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    धरणगाव  : प्रतिनिधी
    शहरातील महात्मा गांधी उद्यान आबालवृद्धांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार असून येणाऱ्या काळात अद्यावत स्विमिंग टॅंक उभारणार आहे. उपजिल्हा रुग्णालय व शासकीय विश्रामगृह साठी प्रस्ताव मंजुरी साठी पाठविला असून लवकरच मंजुरी मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. शासनाने दिव्यांग नागरिकांकरीता सुधारीत विकास धोरण आणले असून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय ! घेतला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने दिव्यांगांचे पुनर्वसन होणार असून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे असून दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन व प्रशासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव येथे दिव्यांग मेळावा व महात्मा गांधी उद्यानाच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व दिव्यांग बांधव यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याचे आयोजन माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील सर व दिव्यांग महासंघामार्फत करण्यात आले होते.*
    दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा झाला गौरव !
    राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ , धरणगाव तर्फे दिव्यांग क्षेत्रात मोलाचे कार्य केल्याबद्दल धरणगाव तालुक्यातील तहसीलदार नितीनकुमार देवरे, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, मुख्याधिकारी जनार्दन पवार व पोलीस निरीक्षक राहुल खताळ या अधिकाऱ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शाल , श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
    भाऊ, पुढचेही मंत्री तुम्हीच ! – भाजपा जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील
    यावेळी बोलतांना भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील यांनी ना. गुलाबराव पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असून पुढचे मंत्रीही तुम्हीच आहात त्यासाठी आम्ही पूर्णपणे पाठीशी असल्याचे सांगत धरणगाव वासीयांनी ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.यावेळी भाजपाचे नगरसेवक ऍड संजय महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले.
    पालकमंत्र्यांनी दिली गुणवत कु. पूर्वा पाटीलला ऍक्टिवा भेट !
    इंदिरा कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी कु. पूर्वा विनोद पाटील हिने ९६% गुण प्राप्त करून १० वीत प्रथम आल्या बद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या तर्फे ऍक्टिवा मोटर सायकल भेट म्हणून देण्यात आली. दरवर्षी ना. गुलाबराव पाटील हे प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला स्कुटी किंवा ऍक्टिवा मोटर सायकल देत असतात. यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. याबद्दल पालकांनी ना. गुलाबराव पाटील यांना धन्यवाद दिले आहे. नशिराबाद येथील ३०० पैकी प्रातिनिधिक स्वरुपात १५ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी दोन हजार पाचशे रुपये चे चेक तसेच दिव्यांग सन्मान पत्र, पिवळे रेशन कार्ड ना. गुलाबराव पाटील व अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन व मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
    गांधी उद्यानाचे उजाळले भाग्य ! उद्यानाची ठळक वैशिष्ट्ये
    स्व. सलीम पटेल यांनी शहरात सुशोभित उद्यान निर्मितीचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी २ कोटी निधी उपलब्ध करून स्व. सलीम पटेल यांची स्वप्नपूर्ती करून धरणगाव वासियांना हे उद्यान खुले करून दिले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 2 एकर जागेत हे सुसज्ज असे उद्यान झाल्यामुळे अबाल वृद्धांसाठी मोठा दिलासा मिळाला असून धरणगाव शहराच्या वैभवात भर पडली आहे. या उद्यानात 400 पेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्यात आली असून आकर्षक फाउंटन तयार करण्यात आले आहे. लहान मुलांच्या खेळण्यासाठी अद्यावत खेळणी बसविण्यात आली असून जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. हिरवेगार लॉन , विविध जातीच्या फुलझाडांची लागवड , ओपन जिम तयार करण्यात आली आहे. सदर उद्यानात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे उद्यानाचे भाग्यच उजडले आहे.
    यांची होती प्रमुख उपस्थिती
    यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन , जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, पवन सोनवणे , तालुका प्रमुख गजानन पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, भाजपाचे वरिष्ठ नेते सुभाषअण्णा पाटील, अँड. संजय महाजन, तहसीलदार नितीन कुमार देवरे, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, न.पा. चे मुख्याधिकारी जनार्दन पवार, इंजि. श्रीकांत बिर्हाडे, सुमित पाटील, माजी गटनेते पप्पू भावे, शिरीष बयस, चर्मकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, माजी उपनगराध्यक्ष विलास महाजन, अंजलीताई विसावे, भगवान महाजन, वासुदेव चौधरी , विजय महाजन , अहमद पठाण , नंदकिशोर पाटील, अजय चव्हाण, शहर प्रमुख दिलीप महाजन , शहर सचिव कन्हेया रायपूरकर, माजी न. पा. गटनेते कैलास माळी सर , यावेळी स्व. सलीम पटेल यांच्या परिवारातील सदस्य फिरोज पटेल, तौसीफ पटेल व रमीज पटेल उपस्थित होते. नशिराबाद येथील प्रदीप साळी, सैयद काझीम अली यांच्यासह सर्व भाजपा व बाळासाहेब सेनेचे पदाधिकारी व नगरसेवक , दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील, तालुकाध्यक्षा सौ. सरलाताई सोनवणे, महानगरप्रमुख अश्फाक बागवान यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व दिव्यांग बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते रवी कंखरे यांनी केले तर प्रास्ताविक व पी. एम. पाटील सर यांनी केले . त्यांनी प्रास्ताविकात महात्मा गांधी उद्यानसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल धन्यवाद मानले व दिव्यांग मेळाव्याची रूपरेषा व दिव्यांग बांधवांना येणाऱ्या अडचणी व समस्यांची माहिती विषद केली. आभार गटनेते पप्पू भावे व भैया महाजन यांनी मानले.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    धरणगांव : दहा हजारांची लाच घेताना अभियंता अटकेत !

    December 4, 2025

    विषबाधा झाल्याने ४७ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.