Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मनसेत पुन्हा वाद ? वसंत मोरे नाराज
    राजकारण

    मनसेत पुन्हा वाद ? वसंत मोरे नाराज

    editor deskBy editor deskNovember 27, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था 

    गेल्या दोन वर्षापासून मनसेचे पुणे शहरातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर नेहमीच येत असतांना दिसून आला आहे. या वादामुळे जिल्हाध्यक्ष पदावर असलेले वसंत मोरे यांचे पद साईनाथ बाबर यांना देण्यात आले होते. पण पुन्हा आता मनसेचा वाद विकोपाला गेला आहे.

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईत गटाध्यक्षांचा मेळावा घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असतानाच आता मनसेतील नाराजीच्या चर्चा समोर आल्या आहेत. मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे पुन्हा नाराज झाल्याची चर्चा आहे. वसंत मोरे यांना मनसेच्या कार्यक्रमाला बोलावण्यात आलं. पण त्यांना भाषणच करू दिलं नाही. त्यामुळे मोरे नाराज असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे पुणे मनसेत सर्व काही अलबेल नसल्याचीही चर्चा सुरू आहे.

    पुण्यात मनसेत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पुण्यातील मनसेच्या कार्यक्रमात वसंत मोरेंना बोलू दिलं नाही. त्यामुळे वसंत मोरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. मोरेंना बारामती लोकसभा मतदारसंघात निरीक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना पुणे कार्यक्षेत्रात काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं सूत्रांनी सांगितलं. वसंत मोरेंना स्थानिक पदाधिकारी डावलत असल्याने वसंत मोरेंची नाराजी कायम आहे. त्यामुळे पुण्यात स्थानिक पदाधिकारी विरुद्ध वसंत मोरे वाद सुरू झाला असून आता राज ठाकरे मोरेंची नाराजी कशी दूर करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    दरम्यान, या नाराजीच्या वृत्तावर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी नाराज नाही. नाराज कार्यकर्ते आहेत. त्या दिवशी पुणे शहरात शाखा अध्यक्षांचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात सर्व कोअर कमिटीचे मेंबर होते. मी त्या स्टेजवर आहे तर मला बोलू दिलं जाईल, असं कार्यकर्त्यांना वाटत होतं. पण मला त्या ठिकाणी बोलायची संधी मिळाली नाही, असं वसंत मोरे यांनी सांगितलं. उलट कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि तात्या आम्ही तुम्हाला ऐकायला आलो होतो. तुम्ही का नाही भाषण केलं? असं विचारत होते. मी म्हटलं, भाषणाच्या यादीत माझं नावच नाही तर मी कसं भाषण करणार?, असं त्यांनी सांगितलं. जे नेते त्या ठिकाणी होते, त्यांनी मला बोलू द्यायला हवं होतं. मलाच काय बाकीचे जे नेते होते ईश्वर शिंदे होते, लोकप्रतिनिधी होते त्यांना बोलू द्यायला हवं होतं. लोकप्रतिनिधींशी संबंधित हा कार्यक्रम होता तर त्यांना बोलू द्यायला हवं होतं. त्यांची भाषणं व्हायलं हवी होती, असंही त्यांनी सांगितलं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शहरात मोकाट कुत्र्यांचा रक्तरंजित धुमाकूळ; एका दिवसात २१ जखमी, प्रशासन झोपेत?

    April 26, 2026

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.