Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : एरंडोलमध्ये १६ वर्षीय मुलाचा अंघोळ करताना मृत्यू
    एरंडोल

    धक्कादायक : एरंडोलमध्ये १६ वर्षीय मुलाचा अंघोळ करताना मृत्यू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 21, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल : शहरातील रेणुका नगरात अंघोळ करताना गिझरमधून गॅसची गळती झाल्याने गुदमरून साई उर्फ यश वासुदेव पाटील (16) या मुलाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवार, 21 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

    गॅस गळतीमुळे जागीच झाला मृत्यू

    एरंडोल शहरातील रा.ती. कावरे विद्यालयाचा विद्यार्थी यश पाटील हा सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अंघोळीसाठी गेला मात्र बराच वेळ झाल्यामुळे तो बाथरूममधून बाहेर न आल्यामुळे आई-वडिलांना चिंता वाटल्याने त्यांनी दरवाजा ठोठावला असता काही एक प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी दरवाजा तोडण्यात आला असता तो बेशुद्धावस्थेत आढळल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. यावेळी आई-वडिलांनी एकच हंबर्डा फोडला. हे वृत्त वाऱ्यासारखे शहरात पसरले असता नागरीकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. दरम्यान, मयत यश हा रेणुका नगरातील रहिवासी व काबरे विद्यालयाचे माध्यमिक शिक्षक व्ही.टी.पाटील यांचा मुलगा तर शिवसेना (उ.बा. ठा.) पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पुंडलिक पाटील यांचा पुतण्या होय.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.