Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » किसान योजनेचे पैसे येत नाही? हे करून पहा !
    कृषी

    किसान योजनेचे पैसे येत नाही? हे करून पहा !

    editor deskBy editor deskNovember 18, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    केंद्रसरकारच्यावतीने पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दरवर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये हप्ता बँकेच्या खात्यात जमा होतो. पीएम किसान योजनेसाठी देशातील 12 कोटीहूं अधिक शेतकरी पात्र ठरलेले होते. 11 वा हप्ता आला तेव्हा 12 कोटीवरून ही संख्या 11 कोटी आणि 19 लाखावर आली आहे. याशिवाय 12 हप्ता म्हणजेच नुकताच नोव्हेंबर महिन्यात जमा झालेला हप्ता आलेली शेतकऱ्यांची संख्या 8 कोटीवर आलेली आहे. जवळपास साडेतीन कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पोहचली नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून पैसे का आले नाही म्हणून संभ्रम निर्माण झाला आहे. यंदाच्या वर्षी कोट्यवधी शेतकरी नव्या यादीपासून वंचित राहिले आहेत. केंद्र तसेच राज्य सरकारच्या ई-केवायसीच्या निर्बंधतेमुळे अनेक नवीन लाभार्थ्यांची नावे पीएम किसान योजनेतून वगळण्यात आली आहे.

    ज्या कुटुंबात कर्जदार व्यक्ती आहे त्यांना पीम किसान योजेनचा लाभ मिळणार नाही, ज्या कुटुंबात पती-पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
    जे लोक शेती ऐवजी इतर कामांसाठी शेतजमीन वापरत आहेत. त्यांनाही योजनेतून वगळण्यात आले आहे.
    याशिवाय अनेक शेतकरी दुसऱ्याची शेती कसतात, ती त्यांच्या नावावर नसते. इतकंच काय तर आई-वडिलांच्या नावावर असते पण शेती मुलं करतात त्यांनाही याचा लाभ मिळत नाही.
    एखाद्या व्यक्तीच्या नावावर शेती आहे, पण तो व्यक्ती सरकारी कर्मचारी किंवा सेवानिवृत्त असेल तर त्यालाही या योजेनचा लाभ मिळणार नाही.
    याशिवाय विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार, मंत्री असेल तर त्याला पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत नाही.
    नोंदणीकृत डॉक्टर, अभियंते, वकील, चार्टर्ड अकाउंटंट व्यक्ती शेताचा मालक आहे, परंतु त्याला दरमहा दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते त्यांनाही याचा लाभ मिळणार नाही.
    यामध्ये पीएम किसान योजेनची ई केवायसी केलेली नसेल तर ती तात्काळ करून घ्या ती झालेली नसेल तर योजनेचा हप्ता मिळणार नाही.
    पीएम किसान योजनेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास pmkisan-ict@gov.in या अधिकृत ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता.

    #PMKISANYOJNA
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोयाबीन तेजीत, पण शेतकऱ्यांच्या हाती नाही माल

    January 23, 2026

    राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय : शेतकऱ्यांना सर्व सेवा एकाच छताखाली; कृषी समृद्धी योजना वेगाने राबविणार !

    November 26, 2025

    पंतप्रधान मोदींचे मोठे विधान : “शतकांच्या जुन्या जखमा आज भरल्या…”

    November 25, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.