Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तणाव आणि चिंता एकसारखे नाही ; जाणून घ्या सविस्तर
    आरोग्य

    तणाव आणि चिंता एकसारखे नाही ; जाणून घ्या सविस्तर

    editor deskBy editor deskNovember 7, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    देशात सर्वांनाच मानसिक आरोग्य ही एक मोठी समस्या निर्माण होऊ लागली आहे. पण लोक याबाबत बोलणे टाळत असतात पण हा छोटा आजार जरी असला तरी भविष्यात तो आजार मोठा होवू शकतो त्यामुळे आपल्या डॉक्टराशी याबाबत बोलले पाहिजे.अनेकांना मानसिक आरोग्याशी संबंधित गोष्टी समजत नाहीत. यामुळेच लोक त्यातून पूर्णपणे सावरत नाहीत. किंवा त्यांना त्यातून सावरायला वेळ लागतो. आजही असे बरेच लोक आहेत ज्यांना तणाव (Strees), मूड स्विंग (Mood Swing) आणि चिंता (Anxiety) हे एकच आजार वाटतात. मात्र, यामध्ये बराच फरक आहे.

    तणाव आणि चिंता एकसारखे नाही
    अनेकदा लोकांना तणाव आणि चिंता यातील नेमका फरक कळत नाही. कारण या दोन्ही आजारांतील लक्षणं जवळपास सारखीच आहेत. जसे की, हृदयाचे ठोके अचानक जलद गतीने वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, किंवा अतिसार, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या जाणवणे. या दोघांमध्ये थोडाफार फरक नक्कीच आहे.

    तणाव आणि चिंता यांच्यातील फरक नेमका काय?
    तणावाचा अवधी खरंतर फार कमी कालावधीच्या स्वरूपात असतो. अनेकदा हा तणाव आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे ट्रिगर होतो. जसे की, ऑफिसमध्ये कामाचा भार खूप जास्त आहे, जवळच्या व्यक्तीशी वाद होणे किंवा काही दीर्घ आजारामुळे नाराज होणे. तणावाची इतर काही लक्षणे देखील असू शकतात. जसे की, राग येणे, एकटेपणा जाणवणे, चिडचिड होणे, मळमळ किंवा चक्कर येणे. अनेक बाबतीत तणाव वाढला की नैराश्यही येऊ शकते. त्यामुळे तणावाचे योग्य वेळी दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे.

    चिंता : याला आपण दीर्घकाळची चिंता म्हणूनही म्हणू शकतो. चिंताग्रस्त व्यक्तीला अस्वस्थता, विनाकारण भीती वाटणे, घाम येणे, जुलाब किंवा बद्धकोष्ठता, झोपेची समस्या, अस्वस्थ वाटणे यासारख्या समस्या जाणवू शकतात. Anxiety मध्ये ट्रिगर पॉईंट ओळखणे थोडे कठीण होते. कारण, व्यक्ती कशामुळे ट्रिगर झाली आहे हे साधारण या आजारात कळून येत नाही.

    मूड स्विंग : मूड स्विंगची समस्या खरं तर तणाव आणि चिंतांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. मूड स्विंग्स म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या भावनिक अवस्थेत अचानक होणारा बदल. मूड स्विंग्स दरम्यान, एखादी व्यक्ती विनाकारण खूप आनंदी किंवा उत्साही वाटू शकते. तसेच, काही काळानंतर ती व्यक्ती दुःखी, चिडचिडी किंवा रागही येऊ शकतो. मूड स्विंगच्या आजारात, एखाद्या व्यक्तीच्या भावना खूप वेगाने बदलतात आणि कधीकधी त्याला स्वतःला देखील समजत नाही. आपली जीवनशैली मूड स्विंगला चालना देण्यासाठी एक प्रमुख घटक असू शकते. उदाहरणार्थ, घर किंवा नोकरी बदलणे, पुरेशी झोप न घेणे, सकस आहार न घेणे इ. याशिवाय माणसाच्या शरीरात हार्मोनल बदलही होतात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    टॅनिंगचा त्रास वाढलाय? जाणून घ्या घरगुती सिरम बनवण्याची सोपी पद्धत

    March 11, 2026

    हळद, मेहंदी आणि कोरफड: नैसर्गिकरीत्या केस काळे करण्याचा सोपा फॉर्म्युला

    January 20, 2026

    वजन कमी करायचंय? दररोज एक बाजरीची भाकरी पुरेशी!

    December 10, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.