Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आज ‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन’; उपाय ?
    आरोग्य

    आज ‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन’; उपाय ?

    editor deskBy editor deskNovember 7, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    2014 मध्ये सर्वप्रथम हा दिवस ‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन’ साजरा करण्यात येईल असे तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी जाहीर केले होते. दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन’ देशभर साजरा करण्यात येतो. कर्करोग आणि त्याची लक्षणे तसेच त्याच्या उपचाराबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार कर्करोग हे जगभरात होणाऱ्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे.

    राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनाचे महत्त्व
    2014 मध्ये, आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाचे मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. या जीवघेण्या आजाराला वेळीच पकडण्याची गरज ओळखून त्यांनी या दिवसाची सुरुवात केली. या दिवशी सरकारी रुग्णालये आणि महापालिकेच्या दवाखान्यात लोकांना मोफत तपासणी केली जाते. हा दिवस नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञ मादाम क्युरी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. त्यांनी कर्करोगाशी लढण्यासाठी दिलेल्या महान योगदानाची आठवण ठेवण्यासाठी हा दिन पाळतात.

    कर्करोगावर काय उपचार केले जाऊ शकतात?
    कर्करोगासाठी अनेक प्रकारचे उपचार आहेत. हे उपचार व्यक्तीच्या शरीरात कर्करोग किती पसरला आहे आणि तो कोणत्या टप्प्यात आहे यावर अवलंबून आहे.
    कर्करोगाच्या उपचारात केमोथेरपी, हार्मोन थेरपी, इम्युनोथेरपी, रेडिएशन थेरपी इत्यादी उपचार पर्याय केले जातात.
    कर्करोगाच्या उपचाराची पद्धत देखील रुग्णाच्या आरोग्यावर आणि त्याच्या कौटुंबिक इतिहासावर अवलंबून असते.
    जर कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात आढळून आला तर तो अगदी सहज बरा होऊ शकतो.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    टॅनिंगचा त्रास वाढलाय? जाणून घ्या घरगुती सिरम बनवण्याची सोपी पद्धत

    March 11, 2026

    हळद, मेहंदी आणि कोरफड: नैसर्गिकरीत्या केस काळे करण्याचा सोपा फॉर्म्युला

    January 20, 2026

    वजन कमी करायचंय? दररोज एक बाजरीची भाकरी पुरेशी!

    December 10, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.