Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भुसावळ तालुक्यातून ३२ जण हद्दपार; प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे आदेश
    क्राईम

    भुसावळ तालुक्यातून ३२ जण हद्दपार; प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे आदेश

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 8, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र : गणेशोत्सव येत्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे या काळात उपद्रवी गुन्हेगारांनी काही करू नये म्हणून
    भुसावळ पोलिसांनी 35 प्रस्ताव सादर केलेल्या  केले होते यापैकी 32 जणांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर व तालुक्यात ९ ते २१ सप्टेंबर या काळात शहर व तालुका बंदीचे आदेश प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी काढले आहे.  पोलीस प्रशासन आता नव्याने २१ जणांचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

    गणेशोत्सवास 10 सप्टेंबरपासून सुरूवात होत असून उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणीही गर्दी, गोंधळ करू नये, शहरबंदी, तालुका बंदीच्या आदेशाचे पालन न करणार्‍यांविरूध्द कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे म्हणाले. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विविध गणेश मंडळात शांतता राहण्यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी शहर व तालुक्यातील पोलीस ठाणे हद्दीतील उपद्रवींविरोधात कारर्वासाठी प्रांताधिकारी यांच्याकडे शहरबंदीचे 35 प्रस्ताव सादर केले होते. यातील 32 जणांना  शहरबंदीचे आदेश काढण्यात आले।असून यात उस्मान हसन गवळी, अनिल राजारा पारधी, संतोष गोपाळ मोरे, कीशोर मनोहर चौधरी, मुकूंदा संतोष लोहार, रवींद्र दिनेश मोरे, खलील हसन गवळी, विक्की देवपुजे, अक्षय रतन सोनवणे, भूषण उर्फ टक्या मोरे, सूरज आनंदा चंडाले. राकेश राजू बार्‍हे, धीरज चंडाले, प्रमोद प्रकाश धांडे, आकाश देवरे, रत्नपाल नरवाडे, जितेंद्र शरद भालेराव, लक्ष्मण दलपत मोरे, गौरव सुनील नाले, सुभान तुकडू गवळी यांच्यासह 32 जणांचा समावेश आहे.
    प्रांताधिकारी यांनी  काढलेल्या आदेशाची शहर पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे व तालुका पोलीस ठाणे यांच्या माध्यमातून अंमलबजावणीला सुरूवात करण्यात आली आहे. तिन्ही पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी नोटिसा बजाविण्यासाठी नियोजन केले असल्याचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे व तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धक्कादायक : तरुणीचा तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यू !

    March 6, 2026

    दोन दुचाकींच्या धडकेत तरुण ठार !

    March 6, 2026

    वर्षभरासाठी सहा जणावंर हद्दपारीची कारवाई

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.