Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पिता पुत्राने घेतला एकमेकांच्या कवेत घेतला निरोप
    क्राईम

    पिता पुत्राने घेतला एकमेकांच्या कवेत घेतला निरोप

    editor deskBy editor deskOctober 26, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कजगाव, ता. भडगाव : प्रतिनिधी 

    दिवाळीच्या दिवशी उगवलेला सूर्य अनेकांसाठी आनंददायी ठरला असला तरी, वडगाव (मुलाणे), ता. पाचोरा येथे याच दिवशी एकाच घरातील दोघांचा अस्त झाला. येथील पिता पुत्राचा नदीत बुडून मृत्यू कृष्णा पवार व लालसिंग पवार झाल्याने पूर्ण गावावर शोककळा पसरली होते.

    वडगाव (मुलाणे), ता. पाचोरा येथील शेतीच आपले विश्व मानणारे लालसिंग पंडित पवार (४२) त्यांचा आठवीत शिकणारा एकुलता एक मुलगा कृष्णा लालसिंग पवार(१३) हे पिता पुत्र दिघी कपाशी वेचून घरी परतत असताना कृष्ण याचा नदी किनाऱ्यावरून पाय घसरल्याने तो नदीत जाऊन पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचे वडील लालसिंग यांनी त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी टाकली.मात्र, त्यांना देखील पोहता येत नसल्याने ते देखील बुडू लागले. ते मुलापर्यंत पोहोचले आणि मुलाने वडिलांना मिठी मारली. पवार यांच्या पुतण्याच्या लक्षात ही बाब येताच या मुलाने घराकडे धाव घेत घटना आजोबांना सांगितली.

    लालसिंग याचे वडील पंडित पवार यांनी त्याठिकाणी येत नदीत उडी मारली, तोपर्यंत वडगाव येथील शेतकरी जयसिंग पवार यांनी पिता पुत्रास बाहेर काढले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पाण्यातच घट्ट मिठी मारत अखेरचा श्वास घेतला. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर पिता पुत्रास चाळीसगाव येथे हलविण्यात आले मात्र तेथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. दि २५ रोजी सकाळी एकच वेळी पिता पुत्रावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    लालसिंग पवार यांना मुलगी असून अकरावीत शिक्षण घेत आहे. तर कृष्णा हा एकुलता एक मुलगा तो आठवीत शिक्षण घेत होता. घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर पाटील, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील यांनी पवार कुटुंबीयांचे सांत्वन करत मृताच्या वारसास शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

    अन् पोचली थेट स्मशान
    सकाळी वडील व एकुलत्या एक भावाच्या अंत्ययात्रेची तयारी सुरु असतानाच बहिणीने एकच आक्रोश केला. बहिणीचा आक्रोश एवढा होता की, ती प्रेत पुढे जाऊ देण्यास तयार नव्हती. उपस्थित तिला धीर देत होते. मात्र वडिलांच्या मायेपासून भावाच्या प्रेमापासून पोरकी झालेली ही मुलगी थेट स्मशानभूमीत हुंदके देत पोहचली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    छत्रपती चौकात भाजपची जंगी सभा; नगराध्यक्षपदासाठी प्रतिभा चव्हाण मैदानात

    November 17, 2025

    संकट मोचकाच्या तथाकथित हनुमानाची भुसावळच्या विजुभाऊची सुपारी यावलमध्ये फेल

    November 17, 2025

    सौदी अरेबियात भीषण अपघात : ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू

    November 17, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.