Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरफोडी प्रकरणातील तिघांना पहूर येथून अटक
    क्राईम

    घरफोडी प्रकरणातील तिघांना पहूर येथून अटक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 6, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- एका किराणा दुकानांतून सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल लांबविण्याची घटना रामेश्वर कॉलनी परिसरातील तुळजामाता नगर येथे घडली होती . एमआयडीसी पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून ती जणांना पहूर येथून अटक केली .

     

    विशाल मुरलीधर दांभाडे, योगेश उर्फ पप्ता राजेंद्र चौधरी आणि विकास उर्फ विक्की नारायण खोडके रा. रामेश्वर कॉलनी असे अटक केलेल्या तिनही संशयित आरोपींची नावे आहेत.

    तुळजामाता नगरात सुरेश तानाजी पाटील हे पत्नी, मुलगा, सून व नातवंडे यांच्यासह राहतात . त्याच्या घरातच सुनंदा किराणा स्टोअर्सचे दुकान शनिवार, ४ सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे सुरेश पाटील यांनी दुकानातील दागिणे व रोकड व्यवस्थित असल्याची खात्री करुन दुकान बंद केले होते. रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास सुरेश पाटील यांचा मुलगा व पत्नी दोन्ही जण दुकान उघडण्यासाठी गेले असता, त्यांना दुकानाचे शटर अर्धवट वाकविलेले तर कुलूपाला असलेली पट्टी तुटलेली दिसली. दागिणे व रोकड ठेवलेली दुकानात बरणी तसेच डबा मिळून आला नाही. बरणीतील दागिणे व डब्यातील ६० हजार रुपयांची रोकड असा चोरट्यांनी एकूण २ लाख ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन आल्याचे समोर आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

     

    पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी परिसराचा आढावा घेतला असता परिसरात राहणारा विशाल मुरलीधर दांभाडे रा. रामेश्वर कॉलनी हा चोरी झाल्यापासून गायब असल्याची माहिती मिळाली. त्याची कसून चौकशी केली असता चोरी करण्याच्या पुर्वसंध्येला दुकानाच्या परिसरात विशाल आणि त्यांचे काही मित्र फिरत होती अशी माहिती मिळाली. संशयित आरोपी हे पहूर ता. जामनेर येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, हमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील यांचे पथक तयार करून पहूर येथून संशयित आरोपी विशाल मुरलीधर दांभाडे, योगेश उर्फ पप्ता राजेंद्र चौधरी आणि विकास उर्फ विक्की नारायण खोडके यांना आज सोमवार ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अटक केली. तिघांनी दुकान फोडल्याची कबुली दिली आहे. यातील विशाल दांभाडे हा घरफोडीतील अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरोधात रामानंद नगर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकुण ६ गुन्हे दाखल आहेत. तिघांना उद्या मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एमआयडीसी पोलीसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, सचिन मुंढे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.