Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » या सूर्यग्रहणात ‘या’ महिलांनी’ घराबाहेर पडू नये
    आरोग्य

    या सूर्यग्रहणात ‘या’ महिलांनी’ घराबाहेर पडू नये

    editor deskBy editor deskOctober 25, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यंदाचे या वर्षातील सर्वात शेवटचे सूर्यग्रहण हे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ ऑक्टोबर २०२२ रोजी मंगळवारी आज होत आहे. सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण असो, दोन्हीचा मानवी जीवनावर खूप मोठा परिणाम होत असतो. ज्योतिषांच्या मते, या काळात काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जो व्यक्ती या काळात सांगितलेली खबरदारी घेत नाही, त्याला ग्रहणाच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते. चला तर मग आज जाणून घेऊया या सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. असे म्हटले जाते की ग्रहणाचा गर्भवती महिलांवर अधिक परिणाम होतो. यादरम्यान काय काळजी घेणे आवश्यक आहे जाणून घेऊया.

    सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय करू नये-
    ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. कारण यावेळी ग्रहणाची किरणे हानिकारक असतात, ज्याचा थेट परिणाम बाळावर होतो. यामागे कुठलीही अंधश्रद्धा नाही. ग्रहणाचा काळ सुरू होण्यापूर्वी पिण्याच्या पाण्यात तुळशीची पाने टाकावीत. हे पाणी तुम्ही ग्रहणानंतर किंवा ग्रहण काळात पिऊ शकता. तुळशीच्या पानांमुळे पाणी दूषित होत नाही. ग्रहणकाळात पाणी पिणे टाळावे, पण जर प्यायचेच असेल तर तुळशीची पाने टाकून ठेवलेले पाणी प्यावे किंवा या दरम्यान नारळाचे पाणी प्यावे.

    ग्रहणाचा काळ हा अध्यात्माचा काळ मानला जातो. या दरम्यान आपल्या इष्टदेवतेचा मानसिक साधना करावी. या काळात गरोदर महिलांनी गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, सूर्य मंत्र, विष्णु मंत्र किंवा सुंदरकांडचा पाठ करावा. हे खूप फायदेशीर मानले जाते. याशिवाय आम्ही तुम्हाला सांगतो की, ग्रहण काळात देवाच्या मूर्तीला हात न लावता जप करावा.
    ग्रहणाचा कुठला विपरीत परिणाम होईल म्हणून गर्भवती महिलांनी मानसिक ताण घेऊ नये. अनावश्यक मसनिक ताणामुळे बाळाला त्रास होऊ शकतो. ग्रहण काळात झोपणे देखील निषिद्ध आहे, परंतु जर आजारपणात आणि गर्भधारणेदरम्यान उठणे शक्य नसेल तर तुम्ही देवाचे ध्यान करून झोपू शकता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    टॅनिंगचा त्रास वाढलाय? जाणून घ्या घरगुती सिरम बनवण्याची सोपी पद्धत

    March 11, 2026

    हळद, मेहंदी आणि कोरफड: नैसर्गिकरीत्या केस काळे करण्याचा सोपा फॉर्म्युला

    January 20, 2026

    वजन कमी करायचंय? दररोज एक बाजरीची भाकरी पुरेशी!

    December 10, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.