Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बापरे ! जगातील प्रदूषित शहर दिल्ली
    राज्य

    बापरे ! जगातील प्रदूषित शहर दिल्ली

    editor deskBy editor deskOctober 25, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    दिवाळीत सर्वत्र फटाक्याच्या आतीशबाजीने प्रदूषित होत असतेच. पण जगातल्या प्रदूषणाची राजधानी हि दिल्ली ठरली असून दिल्लीतील प्रदुषणाची पातळी आधीच वाढलेली आहे. दिवाळीनिमित्त राजधानीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली आणि स्विस संस्थेच्या IQAir नुसार सोमवारी ते जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले. यानंतर पाकिस्तानचे लाहोर दुसऱ्या स्थानावर होते. दिवाळीत दिल्लीचा AQI 312 वर होता. शहराने 2018 मध्ये 281 AQI नोंदवले होते.

    गतवर्षीच्या तुलनेत किंचित सुधारणा
    गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीत दिल्लीत कमी प्रदूषण होते ही दिलासादायक बाब आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी दिवाळीत दिल्लीचा AQI 382 होता. तर 2016 मध्ये AQI 431 होता.
    नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज, इंडियन इन्स्टिट्यूटचे चेअर प्रोफेसर गुफ्रान बेग म्हणाले की, राजधानीतील हवेची गुणवत्ता मंगळवारी गंभीर झोनमध्ये घसरू शकते, परंतु वाऱ्याचा वेग आणि दुपारी उष्ण वातावरण सुधारल्याने प्रदूषकांचे विखुरले जाण्यास मदत होईल. दिल्लीच्या आजूबाजूच्या शहरांची स्थिती कशी होती हे जाणून घेऊया. गाझियाबादमध्ये AQI 301 होता नोएडा मध्ये 303 ग्रेटर नोएडा मध्ये 270 गुरुग्राममध्ये 325 फरिदाबादमध्ये २५६

    हवेची गुणवत्ता पातळी
    AQI कोणत्या श्रेणीमध्ये तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो हे जाणून घेऊया. शून्य ते 50 मधील AQI ‘चांगला’ मानला जातो. तर 51 ते 100 ‘समाधानकारक’ मानले जातात. तर 101 ते 200 ची’मध्यम आणि 201 ते 300 घातक श्रेणीत वर्गवारी करण्यात आली आहे. एखाद्या शहराचा AQI 301 ते 400 च्या दरम्यान असेल तर तेथील हवा विषारी असते. आणि 401 ते 500 अति गंभीर मानले जातात. हिवाळा सुरू झाला की देशातील मोठ्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खालावू लागते. प्रदूषणाचा सर्वाधिक फटका राजधानी दिल्लीला बसतो, जिथे हवा अशा प्रकारे विषारी होते की, लोकांना श्वास घेणे कठीण होते. दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळेही हवेतील प्रदूषण झपाट्याने वाढते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.