Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जनक्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
    जळगाव

    जनक्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 6, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- सामाजिक चळवळीचे ऊर्जा केंद्र असलेल्या नागपूर मधील अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उध्वस्त करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रचंड घोषणा देत जोरदार निदर्शने केली.

    नागपूर येथील अंबाझरी परिसरात असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र १८ एकर विस्तीर्ण जागेवर आहे. देशभरातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणाऱ्या या केंद्रात सुसज्ज ग्रंथालयासह भव्य सभागृह होते.

    मात्र, जातीय विद्वेष मनात बाळगणाऱ्या संघ धार्जिण्या नागपूर महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपा सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उध्वस्त केले. यामुळे आंबेडकरी समाजासह‌ सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांच्या अस्मितेला आव्हान देण्यात आले आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जळगाव शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या समन्वयातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन केले.

    आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले. आंदोलनात भारत ससाणे, रमेश सोनवणे, अमोल कोल्हे, प्रा. प्रीतीलाल पवार ,भारत सोनवणे,दिलीप सपकाळे, फहीम पटेल,चंदन बिऱ्हाडे,किरण नन्नवरे, सुरेश तायडे,सचिन बिऱ्हाडे,जगदीश सपकाळे,राजू मोरे,अॅड.अभिजीत रंधे,कृष्णा सपकाळे,नाना मगरे,चंद्रकांत नन्नवरे,गौतम सोनवणे,डिंगबर सोनवणे,पितांबर अहिरे,मिलिंद तायडे,शैलेश सपकाळे,खंडू महाले,विश्वास सपकाळे, सुधाकर सपकाळे,संदीप कोळी,पिंटू सपकाळे,संजय बागडे,बापू निकम,संतोष गायकवाड, रवींद्र भालेराव, समाधान सोनवणे,अशोक सोनवणे,नितीन मोरे, बंटी सोनवणे,धर्मेश पालवे,गौतम पानपाटील,दीपक सोनवणे, आकाश सपकाळे,दिलीप त्र्यंबक सपकाळे,सुकदेव जाधव,वासुदेव जाधव नाथ,जितेंद्र साळवे,वाल्मीक सपकाळे,साहेबराव वानखेडे आदि सहभागी झाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    उजाड कुसुंबा येथे वृद्धाने घेतला टोकाचा निर्णय !

    April 24, 2026

    दुचाकीचे नियंत्रण सुटले; पती-पत्नी जागीच ठार, चिमुकली बालंबाल बचावली

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.