Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव पोलीस स्टेशनतर्फे जनप्रबोधन एक ध्यास दक्ष नागरिक,जनजागरण संगीतमय एकपात्री पथनाट्य सादर
    क्राईम

    धरणगाव पोलीस स्टेशनतर्फे जनप्रबोधन एक ध्यास दक्ष नागरिक,जनजागरण संगीतमय एकपात्री पथनाट्य सादर

    editor deskBy editor deskOctober 19, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    धरणगाव  पोलीस हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक,इंदिरा कन्या शाळा,कोट बाजार, शहरात विविध ठिकाणी व पाळधी येथे ही पथनाट्य सादर ज्युनिअर चार्ली समाजसेवक सुमित पंडित,यांच्या मुक अभियानातून पोलीस ठाणे धरणगाव हद्दीत आपल्या मुक अभिनयातून विविध गाण्यांतून जनतेस सावधान राहण्याचे आव्हान करण्यात आले,कोरोना महामारी नंतर सर्वात मोठा सण दिवाळी हा साजरा केला, यासाठी धरणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी एक संकल्पना आखली. त्यात नागरिकांची जनजागृती केली पाहिजे विविध प्रयोगांतून नागरिकांना कसे सतर्क राहण्याचे आव्हान करता येईल,त्यासाठी औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध जूनियर चार्ली समाजसेवक सुमित पंडित यांच्याशी संपर्क करून आपण जनतेला धरणगाव शहर हद्दीत जनजागृती चा जो कार्यक्रम घेतला त्यात धरणगाव शहरात देखील आपल्या मूक अभिनयातून एक वेगळा संदेश देऊया ! असा निर्धार केला आणि प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचून त्यांना चोरी, मारामारी,चैन स्नँकींग ,
    पाॅकेट मारी, दुचाकी चार चाकी चोरी यापासुन सतर्क कसे राहावे याची जनजागृती केली! त्यात त्यांची साथ लाभली ती माणुसकी रुग्णसेवा समूहाची दिनांक १९/१०/२०२२ रोजी या कार्यक्रमाची सुरुवात धरणगाव पोलिस स्टेशन पासून करण्यात आली, त्यात बस स्टाप,छत्रपती शिवाजी महाराज चौक,इंदिरा कन्या शाळा,कोट बाजार परिसर पाळधी गावातील नागरिकांना समोर जन जागृती करण्यात आली.या कार्यक्रमांमध्ये सावधान,दिवाळीच्या सणाला गावी जात आहात तर घरफोड्या रोखण्यासाठी शहर पोलिसांनी राबवलेली आपला शेजारी,खरा पहारेकरी या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातुन नागरिकांना सतर्क राहण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे,अप्पर पोलीस अधीक्षक चोपडे सर यांच्या मार्गदर्नाखाली हा कार्यक्रम घेन्यात आला. कार्यक्रमासाठी विषेश सहकार्य लाभले ते पोलीस निरीक्षक राहुल खताळ साहेब,पोलीस उप निरिक्षक संतोष पवार,अमोल गुंजाळ,पो.हे.काँ.संजय सुर्यवंशी,पो.हे.काँ.ईश्वर शींदे,वैभव बाविस्कर,गजेद्र पाटील,पो.ना.मीलींद सोनार,विजय धनगर, विनोद,संदानशीव,महिला पोलीस कर्मचारी मंगला पवार,हर्षली खैरनार,व नागरीकांनी मोठ्या उत्साहाने जनजागृती अभियानात सहभाग घेतला व शाळेतील विद्यार्थ्यांनी तर धमालच केली व समस्त जागृत नागरिक धरनगाव शहर, या गावी कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाला हजेरी लावली होती,ज्युनिअर चार्ली समाजसेवक सुमित पंडित व माणुसकी समुहाचे समाजसेवक चेतन पाटील, मुख्खध्यापक मनोज ठाकरे,यांनी एकपात्री पथनाट्य सादर केले. वरील सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रम पार पाडला. “आपला शेजारी,खरा’ पहारेकरी या संकल्पनेतुन राहुल खताळ यांनी मागदर्शन केले.

    सध्याच्या परिस्थितीत वेगवेगळ्या अफवा सोशल मीडिया द्वारे पसरविण्यात येत आहे. तरी अश्या प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवु नये, कोणत्याही सोशल मीडियातील अथवा फोन वर विस्वास ठेवू नये ,मुक्ताईनगर शहरात घरफोड्या,
    दरोडे,दुचाकी चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता आपल्या दुचाक्यांना जी.पी.आर.एस. शिष्टीम किंवा लोखंडी साखळी,आपल्या गाड्यांना बसवावे,व रोकड,बॅंकेत ठेवा पैशांची आवश्यकता असल्यास शक्यतो आँनलाईन व्यवहाराला सावधानता बाळगून प्राधान्य द्या,आपल्या मोबाइलचा पासवर्ड कोणालाही देऊ नका,ऑनलाईन व्यवहार करताना स्वतःची खबरदारी स्वतःच घ्या,सोसायटया, बंगले, रो हाउस अशा ठिकाणी वॉचमन सुरक्षारक्षक नेमावे,सी.सी.टीव्ही बसवावेत,आपला शेजारी आपला खरा पहारेकरी असतो अशा शब्दांत त्यांनी प्रत्यक्ष नागरिकात जाऊन आवाहन केले.ज्युनिअर चार्लीने व माणुसकी समुहाने ज्या पथनाट्यातुन जनतेस आव्हान केले की दक्ष नागरीकांनी घ्यावयाची काळजी त्याबद्दल केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे पोलीस प्रशासनातर्फे आभार मानतो. – पोलिस निरिक्षक राहुल खताळ धनणगाव पोलीस स्टेशन.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    धक्कादायक : चार चिमुकल्यांचा खून एकाच पद्धतीने; आईच्या कबुलीनं थरकाप!

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.