Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात शिवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्ते शिंदे गटात
    Uncategorized

    धरणगावात शिवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्ते शिंदे गटात

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 2, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा

    धरणगाव प्रतिनिधी | पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाळधी येथील विश्रामगृह येथे धरणगाव शहरातील माजी नगरसेवक वासुदेव चौधरी यांच्या सहसेकडो कार्यकर्त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे धरणगाव शहरात शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे तर शिंदे गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

    दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शिंदे गटाची बैठक घेण्यात आली. यावेळी जळगाव जिल्ह्यातील किमान १० हजार शिवसेनेचे कार्यकर्ते दसरा मेळाव्याला जाणार असल्याची प्राथमिक माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. दरम्यान रविवार 2 ऑक्टोबर रोजी सकाळी पाळधी येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात धरणगाव शहराचे माजी नगरसेवक वासुदेव चौधरी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी शिवसेनेला धक्का देत आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे धरणगाव तालुक्यात राजकीय खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    तापी नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; भुसावळ शहरात शोककळा

    June 14, 2026

    उत्पन्न वाढवण्याच्या संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे भविष्याबाबतचा तुमचा आत्मविश्वास वाढेल.

    June 12, 2026

    अखंड काँग्रेसची संकल्पना पुढे आणा; शरद पवारांनी पुढाकार घ्यावा – संजय राऊतांचे आवाहन

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.