मुंबई : वृत्तसंस्था
टी20 आशिया चषक संपल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेने महिला टी20 आशिया कपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. महिला टी-20 आशिया चषक 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि 15 ऑक्टोबरला संपणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी मंगळवारी महिला टी-20 आशिया कपचे वेळापत्रक जाहीर केले. यावेळी पुरुषांपाठोपाठ महिला आशिया चषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तान विरुद्ध 7 ऑक्टोबरला सामना होणार आहे.
बांगलादेश मध्ये पुढील महिन्यापासून महिला टी-20 आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आशिया कपमध्ये भारताचा सामना ७ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने आयोजित केली जाईल. ज्या अंतर्गत अव्वल चार क्रमांकावर असलेले संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्याचबरोबर आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान, यजमान बांगलादेश, श्रीलंका, यूएई, थायलंड आणि मलेशियाचे संघ सहभागी होणार आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीनंतर अफगाणिस्तानमध्ये महिला संघ आशिया चषक मध्ये नाही. आशिया चषकाचा पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात 1 ऑक्टोबरला होणार आहे.
दुबई येथे खेळल्या गेलेल्या 2022 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला. अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम खेळून 20 षटकांत 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ 147 धावाच करू शकला. श्रीलंकेने आठ वर्षांनंतर आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. पुरुषांच्या आशिया चषकाच्या सुरुवातीला श्रीलंका जिंकेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. पण या स्पर्धेत श्रीलंकेने शानदार खेळ दाखवला आणि आठ वर्षांनंतर आशिया कप 2022 पुरुषांचे विजेतेपद पटकावले.


