Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न ..!
    जळगाव

    जळगाव महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न ..!

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 28, 2021Updated:August 28, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : आज जळगांव महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी युवक व युवती कॉंग्रेस,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, अल्पसंख्यांक विभाग, सामाजिक न्याय विभाग तसेच इतर सेलचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, जे कार्यकर्ते कार्यकारणीत असून पदाधिकारी आहेत व जे पक्षाचे काम करत नसून त्या पदाधिकारी यांना एक संधी देवून पदमुक्त करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

    जळगांव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेली जळगांव महानगरची कार्यकारणी पुर्णपणे बरखास्त करण्यात आली असून नवीन कार्यकारणीची घोषणा येत्या काही दिवसात करणार असल्याचे संगण्यासत आले. आगामी महापालिका निवडनूकीसंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली असून राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी प्रत्येक पदाधिकारी यांनी प्रभागात कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे याबत सूचना देण्यात आल्या.

    या आढावा बैठकीत जळगांव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, एजाज मलिक, प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष स्वप्निल नेमाडे, विद्यार्थी अध्यक्ष अक्षय वंजारी, उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय उपाध्यक्षा कल्पनाताई पाटील, पदवीधर चे अध्यक्ष प्रा.अनिल पाटील, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जितेंद्र चांगरे, कार्याध्यक्ष तुषार इंगळे, अल्पसंख्यांक महानगराध्यक्ष रिजवान खाटिक, अल्पसंख्यांक ग्रामीण अध्यक्ष मजहर पठाण, ओबीसी सेलचे अध्यक्ष कौसर काकर, युवती अध्यक्ष आरोही नेवे महानगर वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र देशमुख, तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते.

    ncpjalgaon abhishekpatil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.