Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे कृषि विभागाचे आवाहन
    जळगाव

    प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 27, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव;- प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत शेतकरी उत्पादक संघ/शेतकरी उत्पादक कंपनी/संस्था/स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक किंवा विशेष उद्देश वाहन (S.P.V) यांना ब्रँडींग व मार्केटींग या घटकातंर्गत कच्चामालाची खरेदी ते विक्रीपर्यंत टप्याटप्पयाने हाती घ्यावयाच्या उपक्रमाचा तपशील, महत्वाचा नियंत्रणाच्या बाबी, गुणवत्ता नियंत्रण, उत्पादनाच्या जाहिरात व प्रचार संबंधित राबवयाचे उपक्रम, सहभागी होणाऱ्या उत्पादकांची संख्या व आर्थिक उलाढाल वाढविण्याचा तपशील असणे अपेक्षीत आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी सदर घटकाच्या खर्चाच्या 50 टक्के अनुदान देय राहील त्यात अंदाजे रक्कम 50 लाख रुपयांपर्यंतचा प्रस्ताव अपेक्षीत आहे.

    या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील उदयोजक, स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, सहकारी उत्पादक, सहकारी संघ यांसाठी अन्न प्रक्रीया उदयोगांना चालना देणे, प्रशिक्षण देणे याबाबींसाठी उभारणी करावयाची आहे. इन्क्युबेशन सेंटर हे स्टार्टअप्स आणि लहान अन्न प्रक्रीया युनिटसाठी नाममात्र भाडे तत्वावर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. इन्क्युबेशन केंद्रामध्ये निर्जलीकरण/पिकवण गृह/बेकरी/ फळ प्रक्रिया युनिट इत्यादी घटकांचा इन्क्युबेशन केंद्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. अन्न प्रक्रीया उद्योगांच्या मानक निकषानुसार पुर्ण प्रक्रीया सुविधा आणि कमीत कमी 7 हजार चौ. फुट जागा असणे आवश्यक असून जळगाव जिल्ह्यासाठी भौतिक लक्षांक एक चा प्राप्त आहे.

    या योजनेतंर्गत सामाईक पायाभुत सुविधा या घटकातंर्गत शेतकरी उत्पादन कंपनी/शेतकरी उत्पादन संघ/सहकारी उद्योजक संघ/सहकारी उत्पादक संस्था/शासन यंत्रणा/खाजगी उद्योग यासाठी इत्यादी घटकांना लाभ देण्यासाठी सामाईक पायाभूत सुविधा जसे- शेती उत्पादनाचे वर्गीकरण, ग्रेडींग, कोठार आणि कोल्डस्टोरज, केळी पिकाच्या प्रक्रियेसाठी सामान्य प्रक्रिया सुविधा इत्यादीसाठी या घटकातंर्गत प्रस्ताव सादर करावयाचे आहे. या घटकाच्या कर्जाशी निगडीत 35 टक्के अनुदान देय राहील. अधिक माहितीसाठी प्रशांत पाटील-९४०४०४८९१२, अजय पाटील-८२७५०५४३९३, सागर धनाड-९४२२२८२९८२, सचिन धुमाळ-९४०४४००५५५, गोसावी- ९८८१८०८६९८, बोरसे-९९६००५०१०१, स्वाती राठोड-७७१८८१२७१८, नवनाथ पवार-८८५५८११०६११ यांचेशी संपर्क साधवा. असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

     

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जामनेरमध्ये बोगस मतदानाचा थरार : कार्यकर्त्यांनी तरुणाला केंद्रावरच पकडलं

    December 2, 2025

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.