Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ब्रेकींग : खूनाचा उलगडा; दागिन्यांसाठी महिलेचा खून करणाऱ्या बाप-लेकाला अटक
    क्राईम

    ब्रेकींग : खूनाचा उलगडा; दागिन्यांसाठी महिलेचा खून करणाऱ्या बाप-लेकाला अटक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 1, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह पथकाची कामगिरी

    मुक्ताईनगर प्रतिनिधी: मलकापूर नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त महिला कर्मचारी प्रभा फाळके याचा क्रुरपणे हत्या करून त्यांचा मृतदेह जाड प्लॉस्टीकच्या पिशवीत भररून मुक्ताईनगर बऱ्हाणपूर महामार्गावरील पुला खाली फेकून दिल्याची प्रकार उघडकीला आला होता. या गुन्ह्यातील शेजारी राहणारे बापलेकाला पोलीसांनी अटक केली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापूर च्या सेवानिवृत्त कर्मचारी श्रीमती प्रभा माधव फाळके (वय-६३) रा.गणपती नगर भाग २ ह्या २७ ऑगस्ट रोजी परिसरातच असलेल्या मंदिरामध्ये पुजेची थैली घेवून दर्शनासाठी जात असल्याचे मुलाला व सुनेला सांगून घरून निघून गेल्या होत्या. २९ ऑगस्ट रोजी जळगाव खांदेश जिल्ह्यातील मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावर संत मुक्ताबाई साखर कारखान्याच्या पुडे कुंड गावाजवळ असणाऱ्या पुलाच्या खालील बाजूस एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत मुक्ताईनगर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्या महिलेची ओळख पटली नव्हती. पुलाच्या खालील बाजूस असलेला मृतदेह पोलिसांनी पुलाच्या वर काढला. याप्रकरणी पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया पुर्ण करून अज्ञात गुन्हा दाखल करुन सदर महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन केले होते.

    त्याबाबतचे फोटो विविध पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले होते. श्रीमती प्रभा फाळके ह्या घरून निघून गेल्याची तक्रार त्यांचा मुलगा रितेश माधव फाळके हा मलकापूर शहर पो.स्टे.ला देण्यास गेले असता त्याठिकाणी त्यांना सदर फोटो दाखविण्यात आले. तेव्हा त्यांनी सदर महिला माझी आई असल्याचे पोलिसांना सांगितले. यानंतर मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.

    त्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी मलकापूर शहरात येवून या खुना संदर्भात माता महाकाली नगर, एसटी बसस्थानक, गणपती नगर व अन्य ठिकाणी चौकशी केली. अखेर त्या अनोळखी महिलेचा मुक्ताईनगर येथे प्लास्टीकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळलेला मृतदेह हा मलकापूर येथील प्रभा फाळके यांचा असल्याचे स्पष्ट झाल्याने मलकापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    सदर मृतदेहाची मुक्ताईनगर पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केल्यानंतर त्याच दिवशी २९ ऑगस्ट रोजी मृतदेहावर पोलिसांकडून मुक्ताईनगर येथेच अंतीम संस्कार करण्यात आले असल्याची माहिती मुक्ताईनगर पो.स्टे.चे एपीआय शेवाळे यांनी सांगितले. याप्रकरणी काल ३१ ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखा पो.नि.किरणकुमार बकाले, मुक्ताईनगर पो.नि.शंकर शेळके यांच्यासह पथक मलकापुर शहरात दाखल झाले.

    सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी केला खून
    नियोजनबध्दरित्या तपासचक्रे वेगाने फिरवत फाळके यांच्या घराशेजारी राहणाऱ्या विश्वास भास्कर गाढे (वय-५०), भार्गव विश्वास गाढे (वय-२१) रा.गणपती नगर,मलकापुर या दोघा बापलेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रभा शेळके यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसाठी बापलेकांनी त्यांच्या राहत्या घरात प्रभा फाळके यांचा निर्घुण खुन करुन त्यांच्या गळ्यातील पोथ, गोफ, अंगठी असा दोन लाखांचा मुद्देमाल काढून घेत फाळके यांचा मृतदेह जाड प्लॉस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये भरुन दोघाबापलेकांनी मोटारसायकल वरुन घोडसगांव (चिखली) मार्गे बऱ्हाणपुर रोडवरील कुंड गावानजीक पुर्णा नदीवरील पुलाखाली फेकुन दिला होता. खुनप्रकरणी दोघा बापलेकांना पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025

    एकाच झाडावर प्रेमीयुगुलाने संपविले आयुष्य !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.