Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चौथीच्या मुलाने घेतला गळफास ; मन सुन्न करणारी घटना
    क्राईम

    चौथीच्या मुलाने घेतला गळफास ; मन सुन्न करणारी घटना

    editor deskBy editor deskAugust 13, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी
    तालुक्यातील दहिगाव येथे राहत असलेल्या चौथीच्या विद्यार्थ्याने घरात कोणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हि घटना समजताच मन सुन्न होत आहे

    सविस्तर वृत्त असे की, दहिगाव (संत) येथील गौरव प्रविण पाटील (वय – ११) याने घरातील दरवाजा आतून बंद करून छताला दोरी बांधून गळफास घेतला. वडील प्रविण नथ्थू पाटील हे सपत्नीक नाशिक येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेलेले असताना ही दुदैवी घटना घडली. घरी गौरव व मोठा मुलगा कॄष्णा यांची जबाबदारी आपले भाऊ रविंद्र पाटील यांच्या कडे सोपविली होती. कृष्णा हा बाहेरून घरी परतल्यावर त्याने दार उघडण्याचा प्रयत्न केले मात्र आतून दार बंद असल्याने त्याने काका रविंद्र पाटील यांना ही माहिती देताच पाटील यांनी घराकडे धाव घेत दरवाजा तोडून आत बघितल्यावर गौरव हा छताला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

    या बाबत दहिगाव पोलिस पाटील विकास कोमलसिंग पाटील यांनी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नयन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सचिन पवार हे करीत आहेत. या दुदैवी घटनेने दहिगाव सह परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.