Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पीक नुकसान अन् कर्जाचा डोंगर; ४८ वर्षीय शेतकऱ्याने जीवन संपविले!
    क्राईम

    पीक नुकसान अन् कर्जाचा डोंगर; ४८ वर्षीय शेतकऱ्याने जीवन संपविले!

    editor deskBy editor deskNovember 23, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    एकीकीडे कर्जफेडीची चिंता असताना दुष्काळजन्य स्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने चिंतेत असलेल्या गजानन पद्माकर पाटील (वय ४८, रा. विदगाव, ता. जळगाव) यांनी आत्महत्या केली. राहत्या घरातच त्यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना दि. २१ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि,  तालुक्यातील विदगाव येथे राहणारे गजानन पाटील हे दिव्यांग होते. दिव्यांग असतानाही गजानन पाटील हे जिद्दीने शेती करायचे. शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतले होते. कर्ज फेडीची चिंता असताना यंदा दुष्काळी स्थिती निर्माण होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे ते आर्थिक अडचणींचा सामना करत होते. रात्रीच्या वेळी त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘कालव्याच्या शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यालाही वेळेवर पाणी मिळाले पाहिजे!’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

    November 23, 2026

    शेतीच्या व्यवहारातून रक्तरंजित वाद; डॉक्टरांचा खून करून मृतदेह बहुळा धरणात फेकल्याची कबुली!

    November 23, 2026

    पिंप्राळा–निमखेडी परिसरातील रस्ते व गटारींच्या विकासकामांना सुरुवात; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

    November 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.