Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » काळाचा क्रूर घाला : विजेच्या धक्क्याने मायलेकाचा दुर्दैवी अंत; जळगावात हळहळ!
    क्राईम

    काळाचा क्रूर घाला : विजेच्या धक्क्याने मायलेकाचा दुर्दैवी अंत; जळगावात हळहळ!

    editor deskBy editor deskNovember 17, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील आसोदा रोडवरील प्रवीण मोहन टॉकीज परिसरात तुटून पडलेली विद्युत तार बाजूला करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आईचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. राहुल सपकाळे (वय ३५) आणि सुनंदा सपकाळे अशी मृत मायलेकांची नावे आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आसोदा रोडवरील मोहन टॉकीज परिसरात सपकाळे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्या घराजवळ विद्युत तार तुटून खाली पडली होती. ही तार बाजूला करण्यासाठी राहुल सपकाळे यांनी प्रयत्न केला असता, त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला. ते विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याचे पाहून त्यांची आई सुनंदा सपकाळे यांनी मुलाला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, मुलाला बाजूला करण्याच्या प्रयत्नात त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला.

    या दुर्घटनेत मायलेक गंभीररीत्या भाजून बेशुद्ध पडले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी दोघांनाही तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. घरालगतच विद्युत तार तुटून पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली. एकाच वेळी कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने सपकाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुग्णालयात नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जुन्या दुचाकीच्या व्यवहारातून तरुणाचा निर्घृण खून : बीड जिल्ह्यात घडली घटना !

    November 17, 2026

    साखरपुड्याचा सोहळा ठरला अखेरचा प्रवास : विटनेरजवळ भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू!

    November 17, 2026

    ३५ टक्के पैसे भरा, शिलाई मशीन मिळवा : आमिषाला बळी पडल्या ९० महिला !

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.