

चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील एका भागातील २० वर्षीय तरुणीचा दुचाकीवरून पाठलागकरून तिचा विनयभंग केल्याची घटना दि. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहरातील एका भागातील दोघा विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी तरुणी ही स्कुटीवरून भाजीपाला खरेदीकरून घरी परत जात असताना संशियतांनी दुचाकीवरून तिचा पाठलाग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर रस्त्यात तिची गाडी अडवून एकाने तिचा हात धरला, तर दुसन्याने तिचा टी-शर्ट मागून ओढत अश्लील शब्दांचा वापर केला. तसेच तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यावेळी तरुणीने विरोध केला असता दोघांनी शिवीगाळ करून धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. प्रसंगी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी मध्यस्थीकरून तरुणीची सुटका केली. यानंतर तरुणीने घरी जाऊन आई व भावाला घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी दि. १४ नोव्हेंबर रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.



