Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कटरने कडीकोयंडा तोडला, तीन घरांवर डल्ला : शाम नगरात पहाटे चोरट्यांची धाडसी चोरी!
    क्राईम

    कटरने कडीकोयंडा तोडला, तीन घरांवर डल्ला : शाम नगरात पहाटे चोरट्यांची धाडसी चोरी!

    editor deskBy editor deskNovember 16, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील शाम नगर परिसरात कुलूप बंद असलेल्या तीन घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. दरवाजा कडीकोयंडा कटरच्या सहाव्याने तोडून चोरट्यांनी घरातून रोकडसह मौल्यवान वस्तू चोरुन नेल्या. ही घटना रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. चोरी झालेल्या एका घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन चोरटे कैद झाले आहे. दोन घरांतील कुटुंबिय बाहेर गावी गेल्यामुळे नेमका किती मुद्देमाल चोरीस गेला हे स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यानुसार चोरटयांचा कसून शोध घेतला जात आहे.

    शहरातील गिरणा पंपिंग रस्त्यावरील शाम नगरातील एकाच लाईनमध्ये असलेले तीन घरे कुलूप बंद होते. रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास डोक्यात टोपी, तोंडाला मास्क आणि हातमोजे घालून आलेले तिघे परिसरात शिरले. त्यांनी कटरच्या सहाव्याने कुलूप, कडीकोवंडा तोडून त्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले आणि कपाटांचे लॉकर उघडून त्यातील ऐवज घेऊन पसार झाले. या तीन घरांपैकी एक घर मालक रविवारी संध्याकाळी घरी आले. त्यांच्या घरातून १० हजार रुपयांची रोकड गेल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला. तर अन्य दोन घरमालक बाहेरगावीच असल्यामुळे त्यांच्या घरातील किती ऐवज चोरीस गेला हे समजू शकले नाही. तसेब ते दोघ घरमालक हे सोमवारी परतणार असून त्यानंतरच किती ऐवज चोरीला गेला हे स्पष्ट होईल.

    एकाच लाईनत असलेल्या तीन घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. दरम्यान, ज्या घरांमध्ये चोरी झाली त्यांच्या घराच्या आजूला सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक राहतात. आवाज झाल्यामुळे त्यांना जाग आली. दरम्यान, त्यांनी शिट्टी वाजविताच आवाज ऐकून तिघे चोरटे तेथून पसार झाले. ऐवज चोरुन चोरटे पसार झाल्यानंतर घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याकरणी पोलिसात रात्री उशिरापर्यंत तक्रार न दाखल्यामुळे गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी एक संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.

    चोरटे पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास चोरी करण्याकरीता या परिसरात आले. ते बॅटरीच्या प्रकाशामध्ये एका घराचा कटरच्या सहाय्याने कडीकोयंडा तोडून आत शिरले. तिघांपैकी एक जण हा दरवाजा जवळ उभा राहून बाहेर लक्ष देत असल्याचे त्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसानी ताब्यात घेतले असून त्यानुसार पोलिसांकडून संशयित चोरट्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भररस्त्यात तरुणीशी गैरवर्तन; नागरिकांनी धाव घेताच संशयितांचा प्रकार उघड!

    November 16, 2026

    दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची आता खैर नाही : जिल्हाभरात पोलिसांची विशेष मोहीम!

    November 16, 2026

    लाचखोर महावितरण कर्मचाऱ्यांना पोलीस कोठडी; सहाय्यक अभियंत्यासह तिघांवर कारवाई!

    November 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.