Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्हा बँकेच्या सत्तेचा ‘महायुती फॉर्म्युला’ ठरला!
    जळगाव

    जिल्हा बँकेच्या सत्तेचा ‘महायुती फॉर्म्युला’ ठरला!

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 13, 2026Updated:November 13, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भाजप १०, शिवसेना ७, राष्ट्रवादीला ४ जागा; जागावाटपावर मंत्री गिरीश महाजनांसह महायुतीच्या नेत्यांचे शिक्कामोर्तब

    विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून महायुतीचा बहुप्रतीक्षित फॉर्म्युला निश्चित झाला आहे. भाजपच्या वाट्याला १०, शिवसेना शिंदे गटाला ७, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ४ जागा देण्याचे निश्चित झाल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून आहे.

    एका हॉटेलमध्ये गुरुवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या फॉर्म्युल्यावर एकमत झाले असून मंत्री गिरीश महाजन यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी जागावाटपावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुती एकत्रितपणे मैदानात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    सात सोसायटी मतदारसंघ भाजपच्या वाट्याला
    जागावाटपाच्या निश्चित झालेल्या फॉर्म्युल्यानुसार चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर, चोपडा आणि यावल या सात सोसायटी मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार असणार आहेत. या मतदारसंघांमध्ये भाजपला आपली ताकद पणाला लावण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात भाजपचे वर्चस्व कायम ठेवण्याच्या दृष्टीने ही विभागणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

    शिवसेनेला सहा सोसायटी मतदारसंघांसह एसटी जागा
    शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला पाचोरा, भडगाव, पारोळा, एरंडोल, जळगाव तालुका आणि बोदवड हे सहा सोसायटी मतदारसंघ आले आहेत. याशिवाय अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील जागाही शिवसेनेच्या वाट्याला देण्यात आली आहे. त्यामुळे सोसायटी मतदारसंघ आणि राखीव जागेच्या माध्यमातून शिवसेनेला सात जागांवर उमेदवार देण्याची संधी मिळणार आहे.

    राष्ट्रवादीला अंमळनेर, धरणगावसह चार जागा
    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अंमळनेर आणि धरणगाव हे दोन सोसायटी मतदारसंघ देण्यात आले आहेत. याशिवाय ओबीसी आणि इतर संस्था मतदारसंघातील उमेदवारी राष्ट्रवादीच्या वाट्याला देण्याचे निश्चित झाल्याची माहिती आहे. अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण चार जागांवर उमेदवार उभे करता येणार आहेत.

    दोन महिला जागा भाजपकडे; एनटी जागाही भाजपच्या वाट्याला

    राखीव जागांच्या वाटपातही महायुतीने पक्षनिहाय समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. अनुसूचित जमातीची जागा शिवसेना शिंदे गटाला, तर एनटी प्रवर्गातील जागा भाजपला देण्यात येणार आहे. याशिवाय दोन्ही महिला राखीव जागांवर भाजपचे उमेदवार असणार असल्याचे निश्चित झाल्याचे समजते.

    इच्छुकांच्या गणितांना बसणार ब्रेक!

    जिल्हा बँकेच्या २१ संचालकपदांच्या निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याने आता प्रत्येक पक्षातील इच्छुकांच्या राजकीय गणितांना नवे वळण मिळणार आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेली रस्सीखेच, मतदारसंघांवरील दावे आणि उमेदवारीसाठी सुरू असलेली मोर्चेबांधणी याला आता अंतिम स्वरूप येण्याची शक्यता आहे. ज्या मतदारसंघांमध्ये मित्रपक्षांचे इच्छुक उमेदवार तयारी करीत होते, तेथे आता त्यांना माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे.
    मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चेत जागावाटपाचा हा फॉर्म्युला निश्चित झाल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीची एकत्रित ताकद दिसणार आहे. मात्र, जागावाटप निश्चित झाले असले तरी प्रत्यक्ष उमेदवार कोण असणार, कोणाला संधी मिळणार आणि कोणाची उमेदवारी कापली जाणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    जिल्हा बँकेच्या सत्तेच्या चाव्या आपल्या हाती ठेवण्यासाठी महायुतीने आखलेली ही रणनीती विरोधकांसाठी किती आव्हानात्मक ठरणार, हे निवडणुकीच्या पुढील टप्प्यात स्पष्ट होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सुमित पाटलांची बाजी पलटली! विभागीय सहनिबंधकांचा अर्ज वैधतेचा निर्णय

    November 13, 2026

    भाऊबीज निमित्ताने आ.मंगेश चव्हाणांनी घेतला आशा वर्कर बहिणीच्या घरी जेवणाचा आस्वाद

    November 13, 2026

    भाऊबीजेच्या आनंदावर दुःखाचा डोंगर : माहेरी आलेल्या २५ वर्षीय विवाहितेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू!

    November 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.