Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाऊबीज निमित्ताने आ.मंगेश चव्हाणांनी घेतला आशा वर्कर बहिणीच्या घरी जेवणाचा आस्वाद
    चाळीसगाव

    भाऊबीज निमित्ताने आ.मंगेश चव्हाणांनी घेतला आशा वर्कर बहिणीच्या घरी जेवणाचा आस्वाद

    editor deskBy editor deskNovember 13, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव, प्रतिनिधी : राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकीची आणि आपुलकीची नाती जपण्याचे एक वेगळे उदाहरण चाळीसगाव तालुक्यात पाहायला मिळत आहे. तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील १५०० हून अधिक आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंशी भावा-बहिणीचे अनोखे नाते निर्माण केले आहे. दरवर्षी भाऊबीजेच्या निमित्ताने या सर्व भगिनींचा सन्मान करून त्यांना साडीची भेट देण्याची परंपरा त्यांनी जोपासली आहे. या नात्याचा एक भावनिक प्रसंग नुकताच लोजे आंबेहोळ येथे अनुभवायला मिळाला.

    आमदार मंगेश चव्हाण हे तालुक्यातील विविध गावांमध्ये विकासकामे, सामाजिक उपक्रम किंवा अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने जात असतात. अशा वेळी त्या-त्या गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई आपल्या हक्काच्या भावाचे मोठ्या आपुलकीने स्वागत करतात. भाऊबीजेपुरते मर्यादित न राहता वर्षभर जपले जाणारे हे नाते आता एका मोठ्या कुटुंबाचे स्वरूप घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

    नुकतेच लोजे आंबेहोळ येथे आयोजित भाऊबीज सोहळ्यानिमित्त आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थिती लावली. यावेळी गावातील आशा वर्कर सौ. कमलताई अनिल पवार यांच्या घरी त्यांनी अगदी कौटुंबिक वातावरणात जेवणाचा आस्वाद घेतला. लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर आपल्या बहिणीच्या घरी आलेला हक्काचा भाऊ म्हणून त्यांनी स्वीकारलेला हा पाहुणचार उपस्थितांसाठी विशेष भावनिक क्षण ठरला.

    यावेळी अंगणवाडी सेविका संगीताबाई राठोड, भारती पाटील, आशा वर्कर अनिता राठोड, मदतनीस सुनिता पाटील तसेच गावच्या सरपंच वैशाली संदीप राठोड यांच्यासह इतर भगिनी उपस्थित होत्या. सर्वांनी आमदार चव्हाण यांचे आपुलकीने स्वागत केले.

    बहिणींनी दिलेले प्रेम हीच आयुष्यातील खरी कमाई – आमदार मंगेश चव्हाण

    “चाळीसगाव तालुक्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई या माझ्यासाठी केवळ शासकीय यंत्रणेचा भाग नाहीत, तर माझ्या हक्काच्या बहिणी आहेत. दरवर्षी भाऊबीजेला मी त्यांना साडीची भेट देतो; मात्र या बहिणी मला जे भरभरून प्रेम, माया आणि आशीर्वाद देतात, त्याची परतफेड कोणत्याही भेटवस्तूने होऊ शकत नाही. तालुक्यातील कोणत्याही गावात गेल्यानंतर माझी बहीण माझी वाट पाहत असते, ही भावनाच माझ्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे. हे नाते पदाचे किंवा राजकारणाचे नसून मायेचे, विश्वासाचे आणि आयुष्यभर जपण्याचे आहे,” अशा भावना आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केल्या.

    भाऊबीजेच्या साडी भेटीतून जुळले हजारो बहिणींचे ऋणानुबंध

    आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई या ग्रामीण भागातील आरोग्यसेवा, माता-बालसंगोपन आणि सामाजिक जनजागृतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासोबतच त्यांच्याशी कौटुंबिक जिव्हाळा जपण्याचा प्रयत्न आमदार चव्हाण यांनी या उपक्रमातून केला आहे. दरवर्षी भाऊबीजेला दिली जाणारी साडी ही केवळ भेटवस्तू न राहता भावा-बहिणीच्या नात्यातील प्रेमाचे प्रतीक बनली आहे.

    लोजे आंबेहोळ येथील कमलताई पवार यांच्या घरी झालेल्या या कौटुंबिक भेटीमुळे या अनोख्या नात्याची पुन्हा एकदा प्रचिती आली. एका बाजूला हजारो बहिणींच्या पाठीशी उभा राहणारा भाऊ आणि दुसऱ्या बाजूला आपल्या भावावर मायेचा वर्षाव करणाऱ्या बहिणी, असे भावनिक चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सुमित पाटलांची बाजी पलटली! विभागीय सहनिबंधकांचा अर्ज वैधतेचा निर्णय

    November 13, 2026

    जिल्हा बँकेच्या सत्तेचा ‘महायुती फॉर्म्युला’ ठरला!

    November 13, 2026

    भाऊबीजेच्या आनंदावर दुःखाचा डोंगर : माहेरी आलेल्या २५ वर्षीय विवाहितेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू!

    November 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.