Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अजित पवारांच्या घातपाताच्या संशयावरून राजकीय वाद पेटला : गृहराज्यमंत्री कदमांच्या राजीनाम्याची आ.अनिल पाटलांची मागणी 
    अमळनेर

    अजित पवारांच्या घातपाताच्या संशयावरून राजकीय वाद पेटला : गृहराज्यमंत्री कदमांच्या राजीनाम्याची आ.अनिल पाटलांची मागणी 

    editor deskBy editor deskNovember 12, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. या अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त करत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केलेल्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटील यांनी थेट गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. रामदास कदम यांच्याकडे घातपातासंदर्भात काही पुरावे किंवा ठोस माहिती असेल, तर ती तपास यंत्रणांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

    रामदास कदम यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करत काही गंभीर आरोप केले आहेत. या विधानांवर प्रतिक्रिया देताना अनिल पाटील म्हणाले की, रामदास कदम यांच्याकडे अजित पवार यांच्या घातपातासंदर्भात काही माहिती किंवा ठोस पुरावे असतील, तर त्यांनी ते तातडीने संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करायला हवेत. विशेष म्हणजे रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत. त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांच्या कुटुंबातील व्यक्तीकडे एवढी महत्त्वाची माहिती किंवा पुरावे असतील आणि ते अद्याप तपास यंत्रणांपर्यंत पोहोचले नसतील, तर ही गंभीर बाब असल्याचे अनिल पाटील यांनी म्हटले.

    रामदास कदम यांच्याकडे अजित पवार यांच्या अपघाताबाबत काही पुरावे असतील आणि ते सीबीआय किंवा अन्य तपास यंत्रणांना देण्यात आले नसतील, तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा, अशी आक्रमक भूमिका अनिल पाटील यांनी मांडली.  गृहराज्यमंत्र्यांच्या घरातच या प्रकरणासंदर्भातील महत्त्वाची माहिती उपलब्ध असल्याचा दावा होत असेल, तर ती माहिती तपास यंत्रणांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही का झाली नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. योगेश कदम यांनी कर्तव्यात कसूर केली असून गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करत सर्वप्रथम त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी अनिल पाटील यांनी केली.

    अजित पवार यांच्या निधनासंदर्भातील प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप करून चालणार नाही. रामदास कदम यांच्याकडे घातपातासंदर्भात काही ठोस पुरावे किंवा माहिती असेल, तर ती संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करणे आवश्यक आहे, असे अनिल पाटील यांनी स्पष्ट केले. पुरावे असूनही ते तपास यंत्रणांपर्यंत पोहोचवले गेले नसतील, तर संबंधित मंत्र्यांच्या जबाबदारीचा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे योगेश कदम यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.

    दरम्यान, रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांना अद्याप तपासातून पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील सत्य समोर येण्यासाठी संबंधित पुरावे तपास यंत्रणांकडे सादर होणे आणि निष्पक्ष तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातावरून सुरू असलेल्या राजकीय वादात अनिल पाटील यांच्या या मागणीमुळे आता नव्या राजकीय संघर्षाला तोंड फुटले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    संपत्तीच्या वादातून रक्ताच्या नात्यालाच गोळ्या : मुलाचा वडील आणि सख्ख्या भावावर गोळीबार !

    November 12, 2026

    इन्स्टाग्राम रीलचा नाद जीवावर बेतला : हातातच फुटला स्काय शॉट; तरुणाच्या हाताला तब्बल ७२ टाके!

    November 12, 2026

    सतेज पाटील गटाला धक्का : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी महायुतीचे राजेश पाटील !

    November 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.