Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावच्या मातीतले हिरे चमकले : ग्रॅपलिंग-मल्लयुद्ध स्पर्धेत दोन कांस्य, एका रौप्यपदकाची कमाई!
    जळगाव

    जळगावच्या मातीतले हिरे चमकले : ग्रॅपलिंग-मल्लयुद्ध स्पर्धेत दोन कांस्य, एका रौप्यपदकाची कमाई!

    editor deskBy editor deskOctober 28, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगावच्या मातीत घडलेले हिरे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी सज्ज झाले आहेत! पैलवान हितांशू राजपूत, पैलवान भूषण हटकर आणि पैलवान शरद हटकर यांनी २४ ते २६ ऑक्टोबर दरम्यान उत्तराखंड येथे झालेल्या ग्रॅपलिंग-मल्लयुद्ध चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्यपदके आणि एक रौप्यपदक पटकावून महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

    या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर या तिन्ही पैलवानांची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. ही बाब संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.  या यशामागे त्यांचे वस्ताद पैलवान चेतन शिंदे, पैलवान कल्पेश मराठे, पैलवान आशिष ठाकरे आणि पैलवान भैया पिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कठोर परिश्रमांमुळे, सातत्यपूर्ण सरावामुळे आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे या तरुण पैलवानांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

    जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या सहकार्याने आणि प्रोत्साहनामुळे या खेळाडूंना पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळाली. त्यांच्या पाठिंब्यामुळे या खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.  जिद्द, मेहनत, शिस्त आणि गुरुजनांचे मार्गदर्शन यांच्या बळावर जळगावच्या या सुपुत्रांनी मिळवलेले यश निश्चितच अभिमानास्पद आहे. नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपमध्येही हे पैलवान उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राचा आणि भारताचा नावलौकिक वाढवतील, अशी अपेक्षा आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दिवाळीत रात्री १० वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

    October 28, 2026

    पिंप्राळ्यात शोककळा : इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करताना योगेश वाघ यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू!

    October 28, 2026

    २१ वर्षीय सनीच्या खून प्रकरणात सहा जणांना पोलिस कोठडी; तपासाला वेग

    October 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.