Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पिंप्राळ्यात शोककळा : इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करताना योगेश वाघ यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू!
    क्राईम

    पिंप्राळ्यात शोककळा : इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करताना योगेश वाघ यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू!

    editor deskBy editor deskOctober 28, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील पिंप्राळा परिसरात एका घरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून योगेश उर्फ भैय्या वाघ या खासगी वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

    मिळालेल्या माहितीनुसार, मृत योगेश वाघ हे शिवसेना ठाकरे गटाचे पिंप्राळा भागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेलेल्या योगेश यांच्या अपघाती मृत्यूची बातमी दुपारी समजताच त्यांच्या कुटुंबीयांसह स्थानिक कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच नातेवाईक आणि शिवसैनिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. ठाकरे गटाचे माजी महानगर अध्यक्ष गजानन मालपुरे यांनीही या दुर्दैवी घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

    दरम्यान, जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची ही दुसरी मोठी घटना आहे. कालच भुसावळ येथे एका शेतकरी दाम्पत्याचाही विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. घरात मुलीच्या साखरपुड्याची आनंदाची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांवर काळाने घाला घातला. भुसावळच्या या घटनेची हळहळ ताजी असतानाच, आज शिवसेना विभागप्रमुख योगेश वाघ यांचाही अशाच प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दिवाळीत रात्री १० वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

    October 28, 2026

    जळगावच्या मातीतले हिरे चमकले : ग्रॅपलिंग-मल्लयुद्ध स्पर्धेत दोन कांस्य, एका रौप्यपदकाची कमाई!

    October 28, 2026

    २१ वर्षीय सनीच्या खून प्रकरणात सहा जणांना पोलिस कोठडी; तपासाला वेग

    October 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.