
मुक्ताईनगर : प्रतिनिधी मनोज पाटील
मुक्ताईनगर येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस आगारात आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी बस आगारातील अधिकारी, कर्मचारी, चालक व वाहक उपस्थित होते.
आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांनी रामायण या महान ग्रंथाची रचना करून भारतीय संस्कृती, साहित्य आणि समाजाला मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या विचारांतून सत्य, सदाचार, कर्तव्यनिष्ठा आणि मानवतेचा संदेश मिळतो. त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले. या जयंतीनिमित्त बस आगार परिसरात महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमामुळे आगार परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.



