
अंजनी विद्यालयात सेवा संकल्प अभियान अंतर्गत व्याख्यान
धरणगाव : प्रतिनिधी
कॅन्सर मुक्त निरोगी जीवन जगायचे असेल तर व्यसनापासून दूर राहून सेंद्रीय भाज्यांचा आहार घेतला पाहिजे असे प्रतिपादन कॅन्सर तज्ञ डॉ.निलेश चांडक यांनी केले.ते अंजनी ग्रुप दुय्यम विद्यामंदिरात सेवा संकल्प अभियान अंतर्गत व्याख्यानात बोलत होते.जळगाव पश्चिम जिल्हा भाजपा वैद्यकीय आघाडीमार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प चे माजी शिक्षण सभापती पी. सी.पाटील होते.यावेळी व्यासपीठावर वैद्यकीय आघाडीचे जिल्हा अध्यक्ष डॉ.नितीन पाटील,किशोर झवर,जगन्नाथ पाटील,मुख्याध्यापिका प्रियंका पाटील,पर्यवेक्षक अविनाश रोकडे,विनोद सैंदाने, राजू बोरसे,संजय बोरसे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर झवर ,सूत्रसंचालन समाधान पाटील आणि आभार मुख्याध्यापिका प्रियंका पाटील यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.



